नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजे-आ.अग्रवाल

0
20

गोंदिया दि.३०ः-: शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या व्यक्तिगत लाभाच्या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. गोरगरीब, शोषित-पीडित नागरिकांकरिता व्यक्तिगत योजना शासन लागू करते. मात्र, विविध विभागाकडून आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात नागरिक असमर्थ ठरतात. तरीही अशा नागरिकांपर्यंत या योजना पोहोचविण्यात शासकीय विभाग उदासीन आहे. तेव्हा या सामाजिक दायित्वाला पूर्ण करण्यासाठी सर्व कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. ते खातिया येथे आयोजित व्यक्तिगत लाभ योजना शिबिरात बोलत होते..

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य विजय लोणारे, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, पं.स.उपसभापती चमन बिसेन, शंकर नारनवरे, संतोष घरसेले, लक्ष्मण तावाडे, सेवंताताई तावाडे, स्वाती हत्तीमारे, केशवराव तावाडे, सूरज खोटोले, रामकला थेर, सरिता तरोणे, वंदना चौरे, चित्रकला बागडे, महेश चौरे, राजेंद्र रामदत्ती, झिंगरलाल शिवणकर, वाय.के. उईके, बाबुराव तावाडे, शालिकराम महारवाडे, सुकचंद शहारे, नोहरसिंह घरसेले, बंडू सोलंकी, रूपचंद गिऱ्हेपुंजे, बाबुराव सोनेवाने, धनलाल तावाडे, मीना तावाडे, संतोष बागडे, इठुजी तावाडे, मनोज नैकाने, मोहन मेंढे उपस्थित होते. .

अग्रवाल म्हणाले, सर्व अधिकाऱ्यांनी समजून घ्यावे की सामान्य नागरिकांपर्यंत व्यक्तिगत लाभाच्या योजना पोहोचल्या पाहिजेत. तेव्हा त्यांनी त्यांना मदत केली पाहिजे. तसेच अर्जदाराला त्रास देण्याचे काम करू नये अशी तंबी त्यांनी दिली. दरम्यान आमदार गोपालदास अग्रवाल यांनी लाभार्थ्यांच्या समस्या समजून घेत संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. यावेळी सर्वाधिक तक्रारी राशनकार्डसंबंधी प्राप्त झाल्या. शिबिरात ७० उत्पन्न दाखले, २० संजय गांधी-श्रावणबाळ योजनेचे अर्ज, ६७ राशनकार्ड संबंधी अर्ज, १३ मतदानकार्ड संबंधी अर्ज व १३ शासकीय डॉक्टरांकडून देण्यात आले..