हे सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासाणारे-ना.बडोले

0
11

अर्जुनी मोरगाव,दि.01 : देशातील जनतेला अन्नधान्याच्या उत्पादनाचे तारणहार, ज्याच्याकडे जगाचा पोशिंदा म्हणून पाहिल्या जाते. त्या शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण उन्नती व हितासाठी केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी मदतीसाठी धावून येत आहे.मागील सरकारचे पाप नष्ट करुन गाव पातळीवरील समस्त शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सध्यास्थित होत असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील खोळदा, कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड बाजार समितीचे उपबाजार नवेगावबांध येथील शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काशीफ जमा कुरैशी, खरेदी विक्री समितीचे सभापती नामदेव कापगते, बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर, खरेदी-विक्री समितीचे उपसभापती केवळराम पुस्तोडे, तालुका भाजपाध्यक्ष उमाकांत ढेंगे, तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, शिवनारायण पालीवाल, जि.प. सदस्य तेजुकला गहाणे,पं.स.सदस्य रामलाल मुंगणकर, तहसीलदार धनंजय देशमुख उपस्थित होते.