राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दिल्ली येथे २६ नोव्हेंबरला धरणे आंदोलन

0
8

गोंदिया,दि.01 राष्ट्रीय ओबीसी महासंघाने संवैधानिक दिनाचे औचित्य साधून दि. २६ नोव्हेंबर २0१८ रोजी नवी दिल्ली येथील जंतर मंतर ग्राऊंडवर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपयर्ंत ओबीसी समाजाच्या संवैधानिक न्याय मागण्यासाठी धरणे आंदोलन आयोजित केले आहे.
ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्यामध्ये ओबीसी समाजाची जनगणना घोषित करून केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, ओबीसींना लावण्यात आलेली क्रिमिलेअरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी, ओबीसी शेतकर्‍यांच्या वनहक्क पट्टयासाठी लागणारी तीन पिढय़ांची अट रद्द करण्यात यावी, ओबीसी शेतकर्‍यांना १00 टक्के सवलतीवर केंद्रात व राज्यात योजना सुरू करण्यात याव्यात, ओबीसी संवर्गाच्या कर्मचार्‍यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे, ओबीसी समाजासाठी लोकसभा व विधान सभा स्वतंत्र निर्वाचन क्षेत्र निर्माण करण्यात यावे, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारत र% देण्यात यावे या व इतर मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी नवी दिल्ली येथील जंतर मंतर ग्राऊंडवर धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे. या आंदोलनात हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, कार्याध्यक्ष डॉ. खुशाल बोपचे, महासचिव सचिन राजुरकर,डॉ. अशोक जीवतोडे, उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर, प्रा. जाधव,सहसचिव खेमेंद्र कटरे, शरद वानखेडे, गुणेश्‍वर आरीकर, मनोज चव्हाण, सुषमा भड, अँड. रेखा बाराहाते,जिल्हाध्यक्ष बबलु कटरे,डाॅ.अजय तुमसरे,रूचित वांढरे, निलेश खोडे,गौरव बिसने यांनी केले आहे.