धान हमीभाव केंद्र सुरु करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे आंदोलन

0
16

कुरखेडा, दि.0१: आदिवासी विकास महामंडळ प्रशासनाच्या उदासीन व लालफितशाही धोरणामुळे तालुक्यातील हमी भाव धान खरेदी केंद्र अद्याप सूरु करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या निषेधार्थ, तसेच शासनाचे या समस्ये कडे लक्ष वेधण्याकरिता तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने  तहसील कार्यलय़ासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. य़ा आंदोलनात कांग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंत हरडे, माजी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, ज्येष्ठ नेते डॉ.नामदेव किरसान,पंचायत समिती सभापती गिरीधर तितराम, उपसभापती मनोज दुनेदार, जि.प. सदस्य प्रल्हाद कराडे यांच्यासह संजय कोरेटी, पुंडलिक निपाने, मनोहर लांजेवार, रोहित ढवळे, संजय नाकतोडे तसेच अन्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत.

तालुक्यात धान मळणी हंगाम जोमात सुरु आहे. दिवाळी जवळ आली आहे. मात्र, अद्याप आविमचे हमी भाव धान खरेदी केंद्र सूरु करण्यात आले नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होण्याची शक्यता आहे. याबाबत वारवांर निवेदने देउनही प्रशासकीय स्तरावरुन कार्यवाही होताना दिसत नसल्याने काँग्रेसच्या वतीने या उदासीन धोरणाचा निषेध करीत उपोषण  करण्यात येत आहे.