मनरेगा कर्मचार्‍यांचा समस्या लवकर मार्गी लावणार – आ. परिणय फुके

0
6

गोंदिया,दि.01ः-  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाच्या माध्यमाने राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना व उपक्रम यशस्वीपणे राबवित आहे. अत्यल्प मानधनावर कार्यरत कर्मचार्‍यांच्या समस्या लवकर मार्गी लावणार अशी ग्वाही गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे विधान परिषद सदस्य आमदार डॉ. परिणय फुके यांनी कर्मचार्‍यांचा शिष्टमंडळाला दिली. गोंदिया जिल्हा मनरेगा कर्मचारी संघटनेचे एक शिष्टमंडळ आपल्या विविध समस्यांना घेऊन आ. परिणय फुके यांच्या नागपुर येथील कार्यालयात भेट घेतली तसेच निवेदन दिले.
निवेदनात अनेक वर्षापासून अत्यल्प मानधनावर कार्यरत असून अजूनपर्यंत मानधनात वाढ करण्यात आले नाही, उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार महाराष्ट्र वगळता लागून असलेल्या अन्य राज्यात ‘समान काम-समान वेतन’ कायदा लागू झाला आहे ते करण्यात यावे, नगरपालिका, नगर पंचायत, सर्व शिक्षा अभियान या विभागात कार्यरत कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना ३५ ते ४५ हजार रुपयापर्यंत महिन्याला मानधन मिळते. मात्र अनेक वर्षापासून मनरेगा मध्ये कार्यरत कंत्राटी कनिष्ठ अभियंता व कृषी सहाय्यकांना फक्त १४ हजार रुपये मानधन दिले जाते तर अन्य कर्मचार्‍यांना ६ हजार रुपये मानधन दिले जाते. आपल्या राज्यातच मनरेगा व अन्य विभागात मानधन संदर्भात असलेली ही आर्थिक समस्या दूर करण्यात यावे, तसेच अन्य सुविधा पुरविण्यात यावे असे नमुद आहे. यावेळी आमदार डॉ. परिणय फुके यांनी मनरेगा कर्मचार्‍यांच्या समस्यांना गांभीर्याने घेतले आणि लवकरच तुमच्या समस्या मार्गी लागतील अशी ग्वाही दिली आहे.