पालिका कर्मचाऱ्यांना ४३ लाखांची भेट

0
7
दिवाळीच्या तोंडावर सेवानिवृत्तांचा सन्मान : कर्मचाऱ्यांनी मानले आभार
गोंदिया,दि.06 : दिवाळी म्हणजे हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सण. या सनानिमित्त खरेदी, उसनवारीची फेड आदी व्यवहार करण्यात येतात. परंतु, त्याकरिता पैशांची आवश्यकता असते. हेच ओळखून गोंदिया पालिकेने  सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली. पालिकेमधून सेवानिवृत्त झालेल्या १८ कर्मचाऱ्यांना उर्वरित निधी धनादेश स्वरूपात दिला. घामाच्या दामाकरिता कर्मचारी पालिकेच्या चकरा मारत होते. ही बाब हेरून नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेत दिवाळीच्या तोंडावर त्यांना ४३ लक्ष १३ हजार ११७ रुपयांचे धनादेश वितरीत केले. कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार असल्याने त्यांनी पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांचे अभिनंदन केले. धनादेश देण्यात आलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये रमेश भांडारकर, शकुन पटले, ओमेंद्र चंद्रीकापुरे, सुमन जीवतोडे, रेहाना इस्माईल शेख, लिलाबाई गणवीर, प्रेमलता शुक्ला, नूरजहा गफ्फार शेख, उमा चक्रवर्ती, राकेश श्रीराम डोंगरे, दिनेश भिमटे, मुकेश भिमटे, माधुरी मसराम, योगेश वर्मा, उदयसिंह उत्तमसिंह यादव, प्रेमनारायण पांडे, विजयकुमार रामेश्वर जोशी, गणेश लाल आदींचा समावेश आहे. यावेळी नगर पालिकेचे भाजपचे गटनेते घनशाम पानतवने, भाजपचे जिल्हा सचिव अमृत इंगळे, दीपक बोबडे, ऋषीकांत साहू, योगेश गिरीया, राजा कदम, अजिंक्य इंगळे, रज्जाक शेख, चंद्रभान तरोणे आदी उपस्थित होते.