विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांची जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांशी चर्चा

0
9

गोंदिया,दि.06 : क्षयरोग कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात एच. आर. लाडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विशाल काळे यांच्यासोबत चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर केले.चर्चेत सन २०१३-१४ चे थकित इंधन भत्ता देयके अदा करणे, दर महिन्याच्या १ तारखेला कर्मचाऱ्यांचे वेतन देणे, जानेवारी १८ ते सप्टेंबर १८ पयंर्तचे थकित इंधन भत्ता देयके अदा करणे, थकित दैनिक भत्ता देयके अदा करणे, प्रत्येक कर्मचाऱ्यांना ३०० रु. प्रतिमहिना इंटरनेट चार्जेस अदा करणे, कर्मचाऱ्यांचे वेतन/दैनिक भत्ता/इंधन भत्ता हे सब अकाउंटमधून करण्यात यावे, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक देवेंद्र भाजीपाले यांना नियमाप्रमाणे वेतन अदा करणे, क्षयरोग कार्यक्रमातील फिल्ड कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक अटेंडन्सप्रणालीपासून सूट देणे, क्षयरोग कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण लागू करणे आदी मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळात ॲड. संजीव रंगारी, अतिरिक्त सरचिटणीस पवन वासनिक, डॉ. डी. एस. भूमकर, भोजेंद्र बोपचे, अमित मंडल, राजू मेश्राम, अनुपम बन्सोड, देवेंद्र भाजीपाले, कु. मंजुश्री मेश्राम, कु. योगिता अडसड, पंकज लुतडे, चंद्रकांत भुजाडे, दिनेश डोंगरवार, आकाश चुन्ने, धनेंद्र कटरे, प्रदन्या कांबडे यांचा समावेश होता, असे संघटनेचे अतिरिक्त सरचिटणीस पवन वासनिक यांनी कळविले आहे..