गोरेगाव,दि.06 : तालुक्यात मूलभूत सोयीअंतर्गत मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवारी आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. यात कुऱ्हाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील बागळबंद येथे सभामंडप, कुऱ्हाडी येथे सभामंडप व सिमेंट रस्ता, हिरापूर येथे सभामंडप, मलपुरी येथे सिमेंट रस्ता, धोंडाटोला येथे सिमेंट रस्ता, सिलेगाव येथे सिमेंट रस्ता व सभामंडप, शहारवाणी जिल्हा परिषद क्षेत्रातील पूरगाव येथे सभामंडप व मोरी बांधकाम, हेटीटोला येथे सिमेंट रस्ता, गणखैरा येथे सिमेंट रस्ता, लेंडेझरी येथे सभामंडप, खाडीपार येथे सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी वरखडे, पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप चौधरी, माजी उपसभापती बबलू बिसेन, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय राणे, पंचायत समिती सदस्य पुष्पराज जनबंधू, पूरगावचे सरपंच अनंत ठाकरे, अलका पारधी, योगेश्वरी चनाप यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते..





