सावली तालुक्यात वाघाच्या हल्यात महिला ठार ,पोर्ला येथे शेतकरी जखमी

0
9

चंद्रपुर,दि.10ः- जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पेंढरू येथील सखुबाई कस्तुरे (५५) ही महिला वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना घडली आहे. सखुबाई काल आपल्या शेतात शेतीचे कामे करायला गेली होती. रात्री परत न आल्याने शोध घेतला असता तिला वाघानी मारले असल्याचे समोर आले.

तर गडचिरोली जिल्ह्यात शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर एका पट्टेदार वाघने  हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि.९) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत किटाळी बिटमधील जंगलात घडली. तुळशीराम जगन रोहणकर(४५) रा.चुरमुरा असे गंभीर शेतकऱ्याचे नाव आहे.ने आरडाओरड करताच शेजारी शेळ्या राखत असलेली दोन मुले त्यांच्या मदतीला धावली व त्यांनी वाघाच्या तावडीतून तुळशीरामची सुटका केली आणि त्याला गावात आणले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी एम.पी.चांगले, वनरक्षक नितीन गडपायले, प्रिया करकाडे, वनपाल विवेक राजूरकर यांनी जखमीची भेट घेऊन वनविभागातर्फे रोहनकर यांच्या कुटुंबीयांना १0 हजार रुपयांची सानुग्रह मदत केली.