गोंदिया पालिकेच्या सभापतिपदावर काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व

0
7

गोंदिया-गोंदिया नगर पालिकेच्या विषय समिती सभापतिपदासाठी झालेल्या आज(ता.११)निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच विषय सभापती निर्विरोध निवडून आले.विशेष म्हणजे पालिकेचे अध्यक्षपद भाजपकडे व उपाध्यक्षपद शिवसेनेकडे आहे.नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या निवडणुकीचे कामकाज उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव व मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी पाहिले. काँग्रेसच्यावतीने पाणी पुरवठा व स्वच्छता विभागासाठी निर्मला मिश्रा तर बांधकाम विभागाचे सभापतिपदासाठी राकेश ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला होता.तर राष्ट्रवादी कॉग्रेसकडून महिला बालकल्याण विभागाच्या सभापतिपदासाठी सुशीला भालेराव,शिक्षण सभापतीकरिता विद्या बंटी बानेवार व नगररचना विभागाच्या सभापतीकरिता चंद्रकला सतीश देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.विशेष म्हणजे भाजप सेनेच्या वतीने एकाही सदस्याने उमेदवारी अर्ज सादर न केल्याने ही निवडणूक निर्वोरिध पार पडली.४० सदस्य असलेल्या सभागृहात काँग्रेसचे भगत ठकरानी व अपक्ष विष्णू नागरीकर हे गैरहजर होते.३८ सदस्य प्रकियेदरम्यान उपस्थित होते.आता गोंदिया पालिकेत सभापती काँग्रेस राँष्ट्रवादीचे असल्याने नगराध्यक्षांना सरकार चालवितांना राजकीय कसब लावावे लागणार आहे.राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतरही गोंदिया पालिकेतील सत्ता भाजपला काबीज करता आली नाही.