दल्ली येथे जागतिक शौचालय दिनानिमित्त महिलांच्या हस्ते शौचालय बांधकामाचे भूमिपूजन

0
12

सडक अर्जुनी,दि.19ः- तालुक्यातील दल्ली येथे कार्यक्रम गोंदिया – जागतिक शौचालय दिनानिमित्त आज 19 नोव्हेंबर रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील दल्ली ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक शौचालय दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे सल्लागार भागचंद्र रहांगडाले यांच्या हस्ते सरपंच अशोक थलाल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सडक अर्जुनीचे विस्तार अधिकारी पंचायत श्री उईके, उपसरपंच राजेश मंदारी, ग्रामपंचायत सदस्य चंदनलाल धुर्वे, उदाराम गावड, सरिता ताई कोडापे, भाग्यश्री हत्तीमारे, गटसमन्वयक राधेश्याम राऊत, समूह समन्वयक भूमेश्वर साखरे आदी उपस्थित होते. सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली. यावेळी शालेय स्वच्छता सल्लागार श्री रहांगडाले यांनी जागतिक शौचालय दिनाचे महत्व विशद करून शौचालय बांधकामचे फायदे, आरोग्यावर होणारा परिणाम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपसरपंच श्री मंदारी , विस्तार अधिकारी उईके, ग्रामपंचायत सदस्य यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सरपंच अशोक थलाल यांनी शौचालय बांधकाम करून गावात शाश्वत स्वच्छता टिकविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून नादुरुस्त शौचालय असलेल्या लाभार्थी गीता शिवचरण मडावी यांच्या येथे ज्यांच्या घरी शौचालय आहे अशा महिलांच्या हस्ते बांधकाम भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर नादुरूस्त शौचालय असलेल्या लाभार्थ्यांना भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्रामसेवक बडोले यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले.