गरिबी निर्मुलन योजना अंतर्गत सायखेडा येथे शेतकरी मेळावा संपन्न

0
17

वाशिमदि. १९ : राष्ट्रीय विधी सेवा गरिबी निर्मुलन योजना २०१५ तथा शेतकरी विधी सेवा अभियान अंतर्गत वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कृषि विभाग, प्रेरणा प्रकल्प, विविध बँक आणि जिल्हा विधिज्ञ संघाच्यावतीने १६ नोव्हेंबर रोजी सायखेडा येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर उपयोजना करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय कार्यालये व बँकाच्या समन्वयाने हा मेळावा घेण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधिज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. अजयकुमार बेरिया होते.यावेळी जिल्हा विधिज्ञ संघाचे सचिव अॅड.प्रसाद ढवळे, उपाध्यक्ष अॅड. अमर रेशवाल, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. मंगेश भाग्यवंत, कृषि अधिकारी सुभाष उलेमाले, कृषि सहाय्यक प्रवीण उलेमाले, एम. डी. तायडे, सुनील पाटील, जयंत जगताप, राजीव दारोकर, निलेश भोजणे, प्रेरणा प्रकल्पचे राहुल कसादे, सोपान अंभोरे आदींनी यावेळी मार्गदर्शन केले.नागार्जुन बौद्ध अल्पसंख्याक बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने शेतकरी आत्महत्या रोखण्याबाबत समाजप्रबोधनपर लघु नाटिका सादर करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच, पोलीस पाटील व नागरिकांचे सहकार्य लाभले.

विविध शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपक्रम

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने गरिबी निर्मुलन योजना २०१५ अन्वये विविध शासकीय योजना शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या व आत्महत्या यावर उपाय म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने असे उपक्रम राबविले जात आहेत. भविष्यातही विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी असे उप्रकम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे यांनी सांगितले.