तिरोडा एसडीओने आदिवासींची अतिक्रमीत जमीन दिली अदानीला

0
24
माजी आमदार दिलीप बनसोड व अन्यायग्रस्त शेतकèयांची पत्रपरिषदेत माहिती
गोंदिया,दि.19ः-तिरोडा तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील अदानी पॉवर प्रोजेक्टला शासनाने दिलेल्या १४१ हेक्टर जमीनीमध्ये तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपदे यांनी अदानीसोबत संगनमत करुन आदिवासीच्या अतिक्रमीत वनजमिनीच्या वनहक्कपट्याच्या प्रस्तावाची तपासणी न करताच अदानी समुहाला दिल्याचा आरोप माजी आमदार दिलीप बनसोड व गराडा येथील अन्यायग्रस्त १४ आदिवासी शेतकèयांनी केला आहे.
बनसोड यांनी पत्रपरिषदेत दिलेल्या माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील गराडा येथील १४ आदिवासी शेतकèयांनी वनजमिनीवर अतिक्रमण करुन धानशेतीला सुरवात केली होती.हे अतिक्रमण १३ डिसेंबर २००५ च्या पुर्वीपासूनचे असून त्या जमिनीचे हक्क मिळावे यासाठी तलाठ्यामार्फेत शासनाच्या आदेशाप्रमाणे वनहक्क समितीमार्फत प्रस्ताव सादर केले होते.त्या प्रस्तावाची तपासणी करुन तहसिलदार तिरोडा यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर केले होते.उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपते यांनी या सर्व १४ शेतकèयांचे प्रस्ताव २०१२ पासूनचे असून ९ ऑक्टोंबर २०१८ रोजी सदर प्रस्ताव रद्द करण्यात आल्याचे कळविल्याने हे आदिवासी शेतकरी भूमिहिन झाले आहेत.उपविभागीय समितीने दिलेल्या पत्रानुसारच्या त्र्युट्यापैकी २००५ पुर्वीचे अतिक्रमण केल्याचा पुरावा सादर न केल्याचा उल्लेख करण्यात आला.सोबतच सदर जागा ही अदानी पॉवरप्लांटला देण्यात आल्याचा उल्लेख उपविभागीय अधिकारी यांनी केला आहे.विशेष म्हणजे या १४ शेतकèयांनी २८ एकर जागेवर धानाची शेती करुन उपजिविका सुरु केली होती.परंतु त्या लावलेल्या पिकाची पर्वा न करता अदानी पॉवर प्लांटच्या प्रशासनाने शेतीजमिनदोस्त करुन तलाव निर्माण करुन पिकाचे केलेल्या नुकसानीला उपविभागीय अधिकारी यांचेही समर्थन असल्याचे सांगत या निर्णयाच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करण्यात आल्याची माहिती दिली.अदानी पॉवर प्लांटला दिलेल्या १४१ हेक्टर जागेपैकी २८ एकर जागा ही या १४ शेतकèयांनी राबलेली आहे.ज्या जागेचे प्रस्ताव व पुरावे नसल्याचा उल्लेख उपविभागीय अधिकारी यांनी केला आहे.त्या जागेच्या वनहक्कपट्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावात तलाठ्याने दिलेले सर्व पुरावे सोबतच ईरजीस्टरवरील अतिक्रमणाची नोंद व ग्रामसभेने घेतलेला ठराव सर्व असतानाही उपविभागीय अधिकारी यांनी प्रस्ताव फेटाळणे म्हणजेच याप्रकरणात अदानीशी संगनमत असल्याचे म्हणाले.त्या १४ शेतकèयामध्ये कोमल राऊत,गोपीचंद कवास,हिवराज कवास,बहादुर राऊत,मदन राऊत,दुलीचंद चनाप,फुलचंद चनाप,दामा राऊत,प्रभुदास राऊत,धनीराम राऊत,रामदास राऊत,बिसन राऊत,गणपत राऊत व रामचंद कवास यांचा समावेश आहे.