ग्रामीण संस्कृती टिकविणे काळाची गरज : रविकांत बोपचे

0
19

एकोडी(गोंदिया),दि.24 : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानव गतीमान झाला आहे. शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या हे तंत्रज्ञान उत्तम असले तरी सामाजिक दृष्ट्या आजही समाज हित साधणारे कार्यक्रम आवश्यक आहेत. त्यातच मंडई, ड्रामा, लावणी आदी ग्रामीण भागातील संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाची गरज असल्याचे मत भाजपचे जिल्हा महामंत्री रविकांत बोपचे यांनी मांडले. ते एकोडी येथे आयोजित ‘अपसरा आली’ मराठी लावणीच्या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य जंगल कामगार संघ पुणेचे संचालक राजेश कटरे, दीप प्रज्वलन पं.स. सदस्य डॉ. किशोर पारधी, रंगमंच पुजक सेवा सहकारी संस्था एकोडीचे अध्यक्ष अशोक रिनाईत व पुरुषोत्तम भदाडे होते. पुढे बोलतांना रविकांत बोपचे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना केले. तसेच ग्रामीण भागात मनोरंजनाचे साधन मुंबलक होत चालले तरी ग्रामीण संस्कृतीची एक वेगळी ओळख आहे.
ही ओळख कायम ठेवण्यासाठी ग्रामीण भागात मराठी नाटिका या शिवाय समाज प्रबोधनात्मक लावणी तमाशे यांचे आयोजन केले जाते.या क्षेत्रात काम करणार्‍या कलावंताना शासनाकडून अनुदान देण्याची योजना आहे.त्या योजनेला लाभ कलावंतानी घ्यावे, तसेच नागरिकांनी ग्रामीण भागातील सामाजिक दृष्ट्या सक्षम असलेली संस्कृती टिकविण्यासाठी सहकार्य करावे,असे मत मांडले. कार्यक्रमाला सरपंच पटले, उपसरपंच देवलाल टेंभरे, शिवशंकर हिरीणखेडे, अजाब रिनाईत, दिलीप रिनाईत, चौलेश हरिणखेडे, उमेश भांडारकर, माजी जि.प.सदस्य मोरेश्वर कटरे, पं.स.सदस्य गुड्डू लिल्हारे यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार माजी उपसरपंच किरणकुमार मेश्राम यांनी मानले