गोवारी समाजाच मागासलेलं पण दूर करण्यासाठी आदिवासी प्रवर्ग महत्वाचा -विनोद अग्रवाल

0
16

गोंदिया,दि.24: स्वातंर्त्यापुर्वी पासून आदीवासींचे जीवन जगणाऱ्या गोवारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून दूर ठेवण्याचे महापाप काँग्रेस प्रणित सरकारांनी केले आहे. मागील ७० वर्षांपासून या समाजाचा लढा सुरु आहे. दरम्यान, समाज बांधवानी प्राणाची आहुती देखील दिली. मात्र निष्ठुर झालेल्या काँग्रेस सरकाराने या समाजावर आपल्या स्वार्थापोटी दयादृष्टी दाखवली नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे गोवारी समाज बांधव चिकाटीने संघर्ष करत आहे. परिणाम स्वरूप न्यायालयाने देखील गोवारी समाजची बाजू समजून घेतली . न्यायालयाने गोवारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेष करण्याचे निर्देश दिले आहे. खऱ्या अर्थाने या निर्णयामुळे गोंड गोवारी या शब्दाचा वाद संपुष्टात आला आहे. मात्र आता राज्य शासनाने देखील या समाजाला न्याय देण्यासाठी तत्परता दाखवावी असे आपले विचार आहेत. या समाजच्या उत्कर्षासाठी आदिवासी प्रवर्ग महत्वाचा ठरेल. असा विश्वास विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केला.

फुलचूर येथे गोवारी समाज सभामंडपाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुलचूर च्या सरपंच महोदया श्रीमती कटरे तर भूमिपूजक म्हणून विनोद अग्रवाल उपस्थित होते. या प्रसंगी विधिवत पूजन करून समाज मंडप बांधकाचे भूमिपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विनोद अग्रवाल पुढे म्हणाले गोंड गोवारी या शब्दप्रयोगाने गोवारी समाज अनुसूचित जमाती प्रवर्गातून वंचित राहिला परंतु हे कटकारस्थान रचण्यात आले होते. खऱ्या अर्थाने विदर्भात गोंड गोवारी असा कोणाही जाती प्रवर्ग नाही. गोंड गोवारी हा समाजच आदिवासी सारखा जीवन जगणारा समाज आहे. हलाखीचे जीवन व्यापन करणारा समाज आहे. या समाजाला विकासाच्या प्रवाहातून दूर ठेवण्यात आले आहे. या समाजाशी आपली असलेली नाळ आपणास अवगत करून देत आहे म्हणून राज्य शासनाने देखील या समाजाला न्याय देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. असे मत विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले. यावेळी सुभानराव रहांगडाले , गजाननजी पोंगळे, सेवकराम बनसोड, शिवनारायण नागपुरे, अनिल रहांगडाले, लक्ष्मीबाई कटरे , कल्पना कुंभरे , जयचंद वाघाडे , गुणलालजी रहांगडाले , राजेश अंबुले, महेश नेवारे , पावन काळसर्पे , डॉ . कोहळे , गजबे गुरुजी , मनोज चामलाटे , विनेश राऊत , उमेश राऊत , संतोष चौधरी , मुकेश लिल्हारे , सव्वालाखे बाई , नेवारे बाई आणि संजय वाघाडे उपस्थित होते.