अपंग मतदारांसाठी होणार सुलभ निवडणूका : डॉ.बलकवडे

0
14
३ डिसेंबर रोजी अपंग दिन साजरा करणेबाबत सभेचे आयोजन
गोंदिया,दि.२७ : प्रत्येक मतदार लोकशाहीचा अभिन्न अंग आहे म्हणून आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने सुलभ निवडणूका(अललशीीळलश्रश एश्रशलींळेप) हे घोषवाक्य जाहिर केले आहे. त्यानुसार अपंग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने अपंग मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत अधिक जनजागृती व्हावी आणि त्यांचा सहभाग वाढावा या हेतूने ३ डिसेंबर रोजी अपंग दिन साजरा करणेबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सुलभ निवडणूक जिल्हास्तरीय समितीची बैठक घेऊन व्यापक प्रमाणात प्रचार-प्रसार करुन अपंग नव मतदारांचे सत्कार करुन कार्यक्रम साजरा करण्याचे निर्देश दिले.
        सदर कार्यक्रम प्रत्येक विधानसभा मतदार संघात राबविण्यात येणार असून तालुकानिहाय मतदार केंद्र स्तरावर, संबंधित मतदार नोंदणी अधिकारी व बुथ अधिकारी यांना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ३ डिसेंबर रोजी प्रत्येक बुथ अधिका?्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये नविन नोंदणी झालेल्या अपंग मतदरांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याबाबत तसेच मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा संदर्भात माहिती देवून अपंग नव मतदारांचे सत्कार करुन अपंग दिन आयोजित करणेबाबतची जवाबदारी देण्यात आली. अपंग मतदारांसाठी विविध शैक्षणिक संस्थानमध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेत विविध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश सदर बैठकीत उपस्थित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांना जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.
       आगामी लोकसभा निवडणूकीसाठी ३१ ऑक्टोंबर पर्यंत जिल्हा प्रशासनातर्फे समाजातील प्रत्येक घटकांसाठी तसेच अपंग/मुकबधीर/कर्णबधीर मतदारांसाठी विशेष मोहिम राबवून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची मोहिम राबविण्यात आली होती. तसेच मुकबधीर/कर्णबधीर या नविन मतदारांशी संवाद साधण्याकरीता सांकेतिक भाषाची कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत क्षेत्रात कार्य करणारे अधिकारी/कर्मचारी यांना मुकबधीर/कर्णबधीर नविन मतदारांशी संवाद कशाप्रकारे स्थापीत करायचे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले होते. लोकशाहीमध्ये प्रत्येक घटक महत्वाचा असून या वेळेस ‘सुलभ निवडणूकाङ्कची तयारी प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. अपंग दिनाच्या कार्यक्रमात जास्तीत-जास्त अपंग मतदारांनी सहभाग घ्यावे असे आवाहन निवडणूक उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे यांनी केले आहे.