तहसील कार्यालयात जनजागृती कार्यक्रम

0
10
सडक अर्जुनी,दि.10ः-जागतिक दिव्यांग दिवसानिमित्त येथील तहसील कार्यालय व शिक्षण विभागाच्या संयुक्तवतीने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करुन नगरातील मुख्य मार्गावरून रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात जिल्हा परिषद हायस्कूल येथे नायब तहसीलदार एन.एम.गावड व रमेश खोकले यांचे हस्ते हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन करून करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापिका माया भौतिक,समावेशीत शिक्षण तज्ज्ञ तथा तालुका समन्वयक आर.आर.गुरनूले,पी.पी.वालदे,व्ही.डब्लू.फुंडे,एल.डी. बोपचे,आर.के.डोंगरे,एल.के.चंदेल,एच.टी. डांगे,आर.एस.डोये,ए. पी.मेश्राम,डी.पी.डोंगरावर उपस्थित होते.तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व दिव्यांगाच्या उपस्थितीत  तहसीलदार राजेंद्र अरमरकर,पोलीस निरिक्षक किशोर पर्वते,ए,आर,मेश्राम,लक्ष्मीकांत धानगाये अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना तालुका समीती, शिक्षक डोंगरे व अनिल मेश्राम कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी दिव्यांग मतदार करीता सुलभ निवडणूक या बाबतीत माहिती देण्यात आली.च दिव्यांगांकरीता राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती दिली.