शेकाप शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरचा संघर्ष करणारा पक्षः जयश्री वेळदा

0
12

चामोर्शी,दि.10ः- शेकाप हा राज्यात कोणत्याही पक्षाची सत्ता असली तरी विधिमंडळात होणाऱ्या लोकहिताच्या निर्णयाच्या बाजूने राहणारा आणि सरकारच्या मनमानी विरोधात शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरचा संघर्ष करणारा पक्ष आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी केले. मौजा गोवर्धन (कुनघाडा) येथे आयोजित ‘जंगलराज’ नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य रमेश बारसागडे तर प्रमुख अतिथी म्हणून शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, सहचिटणीस वसंत गावतुरे, विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम, तालुका चिटणीस दिनेश चुधरी, पुरोगामी महिला संघटनेच्या जिल्हा चिटणीस अर्चना चुधरी,प.स.सभापती आनंद भांडेकर, कुनघाडा चे सरपंच अविनाश चलाख, माजी प.स.सदस्य नामदेव उडाण,प.स.सदस्य संगिता भोयर,आरमोरी विधानसभा चिटणीस रोहिदास कुमरे, ओबीसी जाग्रूती अभियानाचे जिल्हा समन्वयक दिनेश बोरकुटे, तंटामुक्ती अध्यक्ष भाऊजी कुकडे,रमेश चौखुंडे, दुर्वास म्हशाखेत्री, राजू केळझरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता मंडळाचे मंडळाचे अध्यक्ष अविनाश जुवारे,विठ्ठल दुधबळे,अरुण किरमे,पुरुषोत्तम खांडेकर, नितीन कुनघाडकर,संजय गेडाम, भैय्याजी पोहनकर,किशोर भोयर,आकाश बुरांडे,श्रीकृष्ण धोडरे,सुनील काटवे,केशव गव्हारे,संतोष वासेकर, विनोद पोहनकर, संतोष भोयर यांनी परिश्रम घेतले.