सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात तज्ञ वैद्यकीय अधिकारी नियुक्ती करा

0
54

सिरोंचा,दि.10 :-गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या सिरोंचा तालुक्यातील अति महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामीण रुग्णालय व महावितरण कार्यालयाच्या मनमानी कारभाराबाबत भारतीय युवक काँग्रेस सिरोंचाच्या वतीने आज दि. 10 डिसेंबर रोजी तहसीलदार रमेश जसवंत मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून रुग्णालयात तज्ञ वैद्यकिय अधिकारी नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक सिरोंचा शहरात तत्कालीन राज्य शासनाने ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली पण ह्या ग्रामीण रुग्णालयात मागील अनेक वर्षा पासून वैद्यकीय अधीक्षक वर्ग एक चे पद रुग्णालय निर्मिती पासून रिक्त असून त्या सोबत एक्सरे काढण्याकरिता गरीब रुग्णांना शेजारील तेलंगणा राज्यात धाव घ्यावी लागत आहे. तसेच रुग्णालयात सोनोग्राफी मशीनची नितांत गरज असून ही मागणी अतीशय जुनी असल्याने ह्या मागणीची पूर्तता करून रुग्णालयात सध्या तीन एमबीबीएस डॉक्टर कार्यरत असून तीनही डॉक्टरांना रुग्णांनवर योग्य उपचार करण्याच्या अनुभव नसल्याने रेफर टू रेफर करीत असून अनेक रुग्णांना योग्य उपचारा अभावी मृत्यु होत असल्याने रुग्णालयातील रिक्त पदे भरुन एम.बी.बी.एस. डी.जी.ओ. व एम.एस. एम.डी. वैद्यकीय अधिकाऱ्यांची तात्काळ नियुक्ती करून रुग्णालयात गरोदर माता प्रस्तुति करण्याकरिता महिला तज्ञ डॉक्टरांचीही नियुक्ती करावी जेणे करून गरीब गरोदर मातेचे व बाळाचे प्राण वाचू शकतील असा निवेदनात उल्लेख आहे.

दुसरा मुद्दा तालुक्यातील महावितरण कार्यालया मार्फत वीज ग्राहकांचीर लुट होत असून वीज ग्राहकांना मीटर वाचन करून बिल देणे आवश्यक असताना बिल अव्वाच्या सव्वा दिले जात असल्याचे म्हटले आहे.कर्मचाऱ्यां मार्फत सक्तीने बिल वसुली केले जात असून बिलाचा भरणा वेळेवर न झाल्यास पूर्व सूचना न देताच वीज सेवा खंडित करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.येथील उप कार्यकारी अभियंता हे हुकूमशाही पध्दतीने काम करुन वीज ग्राहकांना त्रास देत असल्याने त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. वरील दोन्ही मागण्याची दखल घेऊन येत्या काही दिवसात समस्या तात्काळ न सोडविल्यास भारतीय युवक काँग्रेस तर्फे ग्रामीण रुग्णालया समोर व महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याची इशारा देण्यात आला आहे. निवेदनाची प्रत खासदार अशोक नेते, पालकमंत्री आम्ब्रिश्वरराव आत्राम,विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली याना पाठविण्यात आले आहे.
शिष्टमंडळात भारतीय युवक काँग्रेसचे युवा नेता आकाश परसा, युवा महिला तालुका अध्यक्ष सौ. तिरुमला दासरी, विधानसभा अहेरी महिला सचिव सौ सुनीता परसा, युवक कांग्रेस तालुका अध्यक्ष कौसर खान, मंगेश जाधव, लक्ष्मण मेकाला, रुतू ताई यांचा समावेश होता. पोलीस बंदोबस्तात नायब तहसीलदार एस एस इंगळे यांनी निवेदन स्विकारले. तहसीलदार यांना निवेदन देतेवेळी भारतीय युवक काँग्रेसचे पदाधिकारी राकेश गडपेलीवर, माजित अली, सलमान शेख, सैफ खान, देवय्या यंनगडूला, नागेश कालकोटा, अशोक येनगडूला, दिनेश रेवेली, जतीन आडेपु, समया सिलवेलीराकेश रामांजपुर व भारतीय युवक काँग्रेसचे युवक व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.