13 व 14 डिसेंबर रोजी ग्रंथोत्सव- 2018 चे आयोजन

0
14

भंडारा,दि. 10 :- उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय सचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 13 व 14 डिसेंबर रोजी जकातदार विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय भंडारा येथे जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते ग्रंथोत्सवाचे उदघाटन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी राहणार आहेत. या ग्रंथोत्सवात भव्य ग्रंथ प्रदर्शन व विक्री स्टॉल असणार आहेत.
उदघाटन समारंभाचे प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, खासदार प्रफुल पटेल, खासदार मधुकर कुकडे, आमदार डॉ. परिणय फुके, ॲड. रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, राजेश काशिवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, ग्रंथालय संचालक सुभाष राठोड, ग्रंथपाल वर्ग-1 विभा डांगे, सहाय्यक ग्रंथालय संचालक मिनाक्षी कांबळे उपस्थित राहणार आहेत.
13 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाचा शुभारंभ होईल. जिल्हाधिकारी शांतनू गोयल, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे,जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष धनंजय दलाल यांचे हस्ते ग्रंथदिडींचा शुभारंभ होणार आहे. दुपारी 1.30 ते 3 या दरम्यान पु.ल. देशपांडे – महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व या विषयावर परिसंवाद होईल. विदर्भ साहित्य संघ, नागपूरच्या सदस्या प्रा. शुभदा फडणवीस, धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रविंद्र शोभणे, मनोहरभाई पटेल महाविद्यालय, साकोलीचे प्रा. डॉ. राजेश दिपटे, राष्ट्रीय आदर्श विज्ञान व कनिष्ठ महाविद्यालया रामटेकचे प्रा. जगदिश गुजरकर या परिसंवादात सहभागी होतील. दुपारी 3 ते 5 कवी संमेलन होईल. कवी संमेलनाच्या अध्यक्षास्थनी प्रल्हाद सोनवाने राहणार असून प्रमोदकुमार आणेराव, सुरेश खोब्रागडे, प्रमोदकुमार साहु, अर्चना मोहनकर, डॉ. प्रभाकर लोंढे यांचा सहभाग राहणार आहे.
14 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता ‘ गांधी जीवन व विचार ’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार, लेखक व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे व्याख्यान होईल. दुपारी 12 ते 2 दरम्यान “ गुगल तो सहाय्यक है, पुस्तक ही नायक है ” या महाचर्चेत कवी कुलगुरु कालीदास संस्कृत विद्यापीठ रामटेकचे ग्रंथपाल डॉ. दिपक कापडे, कला व वाणिज्य नाईट महाविद्यालय, नागपूरचे ग्रंथपाल डॉ. अशोक खोब्रागडे, समर्थ महाविद्यालय लाखनीचे ग्रंथपाल डॉ. धनंजय गभणे, शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनीचे ग्रंथपाल डॉ. संजय रायबोले सहभागी होतील. दुपारी 2 ते 4 या दरम्यान ‘स्वरगदिमा’ गदिमा यांच्या जन्मशताब्दी निमित्त संगीत कार्यक्रम होणार आहे. सादरकर्ते श्रीमती आर.एम. पटेल महिला महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख प्रा. राहूल भोरे,सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रा. श्वेता डी. वेगड, प्रा. रेखा ठाकरे, प्रा. महेश पोगळे.
सायंकाळी 4 ते 5 या दरम्यान समारोप कार्यक्रम होईल. समारोपाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले राहणार आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, शिक्षणाधिकारी प्रकाश कोल्हे, जिल्हा कोषागार अधिकारी शंकर बळी, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, जात पडताळणी विभागाचे संशोधन अधिकारी संभाजी पोवार, जिल्हा साहित्य परिषदेचे अध्यक्ष गुरुप्रसाद पाखमोडे, जकातदार विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.आर. हटवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. ग्रंथ महोत्सव स्थळी 13 व 14 रोजी ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल असणार आहेत. या ग्रंथोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शांतनू गोयल, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे व जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी केले आहे.