महारेशीम अभियानाला 15 डिसेंबरला सुरुवात

0
12

वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम
नागपूर, दि. 10 : पारंपारीक शेतीला हमखास आर्थिक उत्पन्न देणारा पर्यावरणपूरक पर्याय म्हणजे रेशीम शेती आहे. राज्यात 15 डिसेंबर पासून महारेशीम अभियानाला सुरुवात होईल, अशी माहिती रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत यांनी आज पत्रकाराशी बोलतांना दिली.. रेशीम शेतीविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करुन रेशीम शेती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे हा महारेशीम अभियानाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.रेशीम धागा तयार करणारे राज्यातील १८ केंद्र (रेलिंग मशीन) पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रेशीम संचालनालयाने यासाठी पुढाकार घेतला असून निविदाही जारी करण्यात आल्या आहेत.
‘महा रेशीम अभियान 2019’ ची सुरुवात 15 डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री अर्जून खोतकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहतील. या कार्यक्रमामध्ये शहरातून रेशीम रथयात्रा निघून तिचा समारोप होईल. वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत रेशीम पुस्तिकेचे विमोचन होईल, अशी माहिती त्यांनी दिली.संचालक बानायत यांनी सांगितले की, रेशमाला १७८ रुपये किलो हमीभाव आहेत. तर खासगी व्यक्तींकडून ७०० ते ८०० रुपये किलोचा भाव देण्यात येत आहे. त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकरी खासगीकडे जात आहे. परिणामी केंद्राकडे रेशीमच मिळत नसल्याने मशीनही बंद आहेत. बंद असल्याने मशीन खराब होण्याच्या परिस्थितीत आहेत. त्यामुळे या मशीन (केंद्र) खासगी व्यक्ती, संस्थांना भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
सद्या वातावरणातील लहरीपणामुळे शेतमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी रेशीम शेती करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. त्यामध्ये महारेशीम अभियानात अधिकाधिक शेतकऱ्यांची नोंदणी करावी असे श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी केले.