विद्युत विभागाच्या ३३ के.व्ही.सबस्टेशनचे भूमिपूजन

0
9

अर्जुनी मोरगाव,दि.17ः-तालुक्यातील बोंडगावदेवी परिसरात नेहमी भेडसावणारी विजेची समस्या लक्षात सरपंच राधेश्याम झोळे, वीज वितरण कंपनी अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अभियंता अमित शहारे, शाखा अभियंता वाटेकर व स्नेहल मेश्राम यांच्या पुढाकाराने बोंडगावदेवी येथे ३३ के.व्ही. विद्युत सबस्टेशनचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजन पं.स.चे सभापती अरविंद शिवणकर यांच्या हस्ते सरपंच राधेश्याम झोळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
यावेळी गोंदिया जि.प.चे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष  बोरकर, निमगावचे सरपंच विश्‍वनाथ बाळबुद्धे, बाकटीचे सरपंच भानुदास वडगाये, खांबीचे सरपंच प्रकाश शिवणकर, प्रकाश टेंभुर्णे, मोरेश्‍वर सोनवाने, अमित शहारे, वाटेकर, स्नेहल मेश्राम, सैय्यद, वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सरपंच राधेश्याम झोळे म्हणाले, बोंडगावदेवी सबस्टेशन मंजुरीसाठी बर्‍याच अडचणी होत्या. मात्र, वीज वितरण विभागाच्या पुढाकाराने या अडचणींवर मात करून सबस्टेशन तयार होत आहे. चंद्रशेखर ठवरे यांनी मानवी जीवनात अन्न, वस्त्र, निवार्‍याप्रमाणे विजेची गरज निर्माण झाली असून या उपकेंद्रामुळे विजेची समस्या सुटेल, असा विश्‍वास व्यक्त केला. यावेळी र%ाकर बोरकर आणि अरविंद शिवणकर यांनीही विचार व्यक्त केले. संचालन वारेकर यांनी केल तर आभार स्वप्निल मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.