भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे बेहाल-आ.अग्रवाल

0
9

गोंदिया,दि.17 : क्षेत्रातील शेतकरी संपन्न व्हावा व क्षेत्रात हरितक्रांती यावी यासाठी आम्ही तालुक्यातील बाघ सिंचन प्रकल्पाच्या सर्व कालव्यांची सफाई करविली. मात्र भाजपच्या धोरणामुळे राज्यातील शेतकºयांचे बेहाल झाल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम चिरामनटोला येथे ३० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर ग्राम चिरामनटोला-कोचेवाही रस्ता डांबरीकरणाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे गोंदिया विधानसभाच नव्हे तर जिल्हाच प्रगतीपथाकडे वाटचाल करीत असल्याचे मत व्यक्त केले.
जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले यांनी, आमदार अग्रवाल यांचे जिल्ह्यातील युवा वर्गाला रोजगारोन्मुख शिक्षण मिळावे हे लक्ष्य आहे. यातूनच पॉलीटेक्नीक, मेडीकल कॉलेज आदिंची स्थापना करण्यात आली असून त्यात ७० टक्के जागा जिल्ह्यातील युवांसाठी राखीव आहे. त्याचा लाभ घेत असल्याचे सांगीतले.
कार्यक्रमाला पंचायत समिती उपसभापती चमन बिसेन, ओमप्रकाश भक्तवर्ती, सत्यम बहेकार, हुकूम नागपुरे, गेंदलाल शरणागत, टिकाराम भाजीपाले, दुर्गा कावरे, लक्ष्मीचंद मेश्राम, डेलेंद्र हरिणखेडे, गोविंद उईके, राधिका कावरे, सुर्यमनी रामटेके, डुडी हरिणखेडे, बिहारी पारधी, कुवर हरिणखेडे, मनोहर भावे, जगदिश पारधी, राजेंद्र मेंढे, प्रतापसिंह सोलंकी, गाधीराव मटाले, अनिल नागवंशी, दुरग बाहे, हेमराज देशकर, लक्ष्मीचंद पाचे, ओमेश पाचे व गावकरी उपस्थित होते.