गडचिरोलीला अवकाळी पावसाने झोडपले,विदर्भात हलक्या सरी

0
5

नागपूर,दि.17: रविवारपासून विदर्भातील जिल्ह्यात हवामानातील बदलामुळे थंड गारवा निर्माण झालेला आहे.रविवारला बहुतांश जिल्ह्यात रात्रीला व सकाळला पावसाने हजेरी लावली.गोंदिया शहरातही सोमवारी सकाळी हलक्या सरी कोसळल्या तर  पहाटेपासून गडचिरोली जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे. भामरागड, अहेरी, आलापल्ली, सिरोंचा आदी भागात सोमवार मध्यरात्रीपासूनच रिमझिम व नंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे धान पिकाला जबरदस्त फटका बसला आहे. विक्रीसाठी आणलेल्या धानावर त्याचा अनिष्ट परिणाम झालेला आहे. तसेच हवेत गारठा वाढल्यानेही अन्य पिकांवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.भंडारा जिल्ह्यातील काही भागातही रिमझिम पावसाने सुरुवात केली आहे.या पावसामुळे खरीपपिकावर मोठा परिणाम होणार आहे.तर धानाच्या पुंजण्यात पाणी शिरल्याने नुकसान होणार आहे.