विमान प्राधिकरणातर्फे जमिनीचा ताबा घेण्यास सुरूवात

0
38

गोंदिया,दि.21- तालुक्यातील बिरसी येथील विमानतळ प्राधिकरणातर्फे विमानतळ प्रकल्पाकरिता भुसंपादीत केलेली ४१ हेक्टर जमिन ताब्यात घेण्यास गुरुवारी सुरूवात करण्यात आली. मात्र  शेतकऱ्यांनी विरोध करीत नियमबाह्यपणे जमिन ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप केला. यामुळे गुरूवारी (दि.२०) या ठिकाणी  तणाव निर्माण झाल्याने रावणवाडी पोलीसांची मदत घेण्यात आली होती.
बिरसी विमानतळ प्रशासनाच्या वतीने पोलीस कर्मचाºयांच्या उपस्थितीत कामठा-परसवाडा या मार्गाला लागून असलेली ४१ हेक्टर जमीन ताब्यात घेण्यास सुरूवात केली. या वेळी जेसीबी व बुलडोजर लावून जमिनीचे सपाटीकरण करण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. दरम्यान या वेळी काही शेतकऱ्यांनी याला विरोध केला. प्राधिकरणाकडून जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नसून या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल आहे. शेतकऱ्यांना एकरी ९ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी त्यानंतरच जमिनीचा ताबा घेण्यात यावा अशी मागणी केली. तर काही शेतकऱ्यांनी आपल्याला अद्यापही जमिनीचा मोबदला मिळाला नसून बळजबरीने जमिनी ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप केला.

विमानतळ प्रकल्पाच्या विस्तारिकरणासाठी जवळच्या परसवाडा, झिलमिली, कामठा व बिरसी येथील एकूण २७७ शेतक-यांच्या १४२ हेक्टर शेतजमीनीचे अधिग्रहण करण्यात आले. परंतु, सदर जमीन आतापर्यंत शेतक-यांच्याच ताब्यात होत्या.मात्र आता विमानतळ प्राधिकरणाने प्रत्यक्षात जमिनी अधिग्रहणाच्या कामाला सुरवात केली आहे. त्यासाठी त्यांनी गुरुवारी कामठा हद्दीतील एकूण ४७ शेतक-यांच्या ४१ हेक्टर शेतजमीनीचा ताबा घेण्याच्या कामाला सुरवात केली. चार वषार्पूर्वी झिलमीली येथील जवळपास ५० हेक्टर शेतजमीनी ताब्यात घेण्यात आल्या.ताबा घेण्यासाठी ताफा शेतात पोहोचताच शेतक-यांनी एकच टाहो फो़डला. सदर शेतजमीनीच्या संदर्भात न्यायालयात प्रकरण सुरू आहे. त्यामुळे मोबदला घेतल्याशिवा य शेतजमीनीला हात लावू देणार नाही.

विमानतळ प्राधिकरणाने नियमानुसार ही जमीन प्राधिकरणाच्या नावे झाली असून भूसंपादन अधिनियमानुसार जमिन ताब्यात घेतली जात असल्याचे बिरसी विमानतळाचे संचालक सचिन खंगार यांचे म्हणने आहे. तर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बिरसी विमानतळ प्राधिकरणाने शेतकºयांना योग्य मोबदला द्यावा. त्यानंतरच जमीन ताब्यात घ्यावे असे मनोज दहीकर या शेतकर्याचे म्हणने आहे