मुख्यालयाबाहेरील बैठकीत व्यस्त उपाध्यक्ष, भाजपच्या निवडीवर खरे उतरणार काय?

0
12

गोंदिया,दि.21-गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेस सोबत हातमिळवणी करीत भारतीय जनता पार्टीने सत्ता स्थापन केली.या सत्तेत अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद भाजपकडे आले.पहिल्या कार्यकाळापासूनच हे सुरु आहे.त्यातही पहिल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात अध्यक्ष व उपाध्यक्षपदी दोन्ही महिलानीच कार्यकाळ पुर्ण संपविला.मात्र त्यांच्या कार्यकाळात दोन्ही पक्षाचे वरिष्ठांना आपण निवडलेले व्यक्ती पक्षाच्या हिताचे असल्याचेच त्यांच्या कार्यप्रणालीवरुन बघावयास मिळाले.मात्र गेल्या जानेवारी २०१८ मध्ये उपाध्यक्षपदावर भारतीय जनता पक्षाने ज्या आशा आकांक्षा व उदिष्ठाने चिचगडचे जिल्हा परिषद सदस्य यांची निवड केली त्या निवडीवर वर्षभरातील कामकाज बघितल्यावर मात्र शंका कुशंका निर्माण होऊ लागल्या आहेत.
पदाधिकारी म्हणून त्यांनी जिल्हा परिषदेच्या आपल्या कार्यालयात किती वेळ काढला हा सुध्दा प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे.त्यातही कार्यालयाचे सुशोभीकरण व बांधकामाच्या विषयाव्यतिरिक्त त्यांनी जिल्हापरिषदेतील प्रशासकीय व्यवस्था सुधारण्यात पुढाकार घेतल्याचे म्हणा किंवा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये सुट्टीच्या दिवशी राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गतच्या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविल्याचेही दिसून येत नाही.भारतीय जनता पक्षाने जिल्ह्याचे महामंत्री व देवरी तालुका निवासी यांच्या आग्रहाखातरच त्यांना उपाध्यक्ष पदावर बसविले असावे यात शंका नाही.
त्यातही महामंत्री यांनीही आपल्या वरिष्ठाकंडे काहीतरी विचार करुनच त्यांच्या नावाची शिफारस केली असावी.परंतु त्यांनी ज्या उद्देशाने शिफारस करुन उपाध्यक्षाची खुर्ची आपल्या तालुक्यात नेली.त्यांनाही जिल्हा परिषदेतील कामकाजाची पध्दत व कार्यालयात पदाधिकारी यांची बसण्याची सायकांळची वेळ लक्षात घेत नक्कीच मनात शल्य बोचत असेल यात शंकेला वाव नसावा असे म्हणण्यास काहीही हरकत नसावी.
आजपर्यंत जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची धुरा विजय शिवणकर,मदन पटले,पंचम बिसेन,छायाताई चव्हाण,विनोद अग्रवाल,रचनाताई गहाणे आदींच्या उपाध्यक्षपदाच्या कार्यकाळाकडे बघितल्यास सुरवातीपासूनच एक वेगळा दरारा होता.त्यांनी कधीही आपल्या कार्यकाळात विषय समित्यांच्या बैठका या खाण्यापिण्याच्या उद्देशाने मुख्यालयाबाहेर अपवादात्मक परिस्थिती बघता ठेवल्याचे दिसून येत नाही.
तसेच त्ङ्मांच्ङ्मा कार्यकाळात शासकीय निवासस्थानही सुसज्ज नव्हते परंतु आता हे सगळे असताना विद्यमान उपाध्यक्षांच्या कार्यकाळाकडे सध्या काही महिन्यापासून बघितल्यास विषय समित्यांच्या बैठका या मुख्यालयाबाहेर होऊ लागल्या आहेत.त्यातही त्या बैठकानंतर जो खाण्यापिण्याचा कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमामुळे तर आजपर्यंतच्या कुठल्याही उपाध्यक्षांने आपल्या विभागातील अधिकाèयासोबत जे केले नसावे तसे प्रकार होत असल्याचे वृत्त व चर्चा समोर येऊ लागले आहे.बोदलकसा व नवेगावबांधच्या विश्रामगृहात झालेल्या विषय समिती बैठकीनंतरच्या समोर आलेल्या किश्यांनी तर अधिकारी ही किती हतबल असतात याचे चित्रच समोर आले असून जिल्हा परिषदेतील पदाधिकाèयांना विभागप्रमुख असलेले अधिकारी व त्यांचे कर्मचारी का जुमानत नाही हे त्या मुख्यालयाबाहेरील बैठकांवरून दिसून येते.
वास्तविक मुख्यालयाबाहेर विषय समितीची बैठक घेतांना ठोस कारण असावे लागते आणि अर्थ व बांधकाम विभागाच्या दोन्ही मुख्यालयाबाहेर झालेल्या बैठकांकडे बघितल्यास ठोस कारण दिसून आले नाही.तर बाहेर झालेल्या एका बैठकीत तर दोन विभागप्रमुखांना चांगलीच कसरत करावी लागल्याची चर्चा सुरु आहे.
त्यातच बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे आपल्या कार्यलयात बसत नसल्याच्या तक्रारी समोर येत असताना ते मात्र नव्याने रुजू झालेले अति.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षातच एका शासकीय कत्रांटदारासोबत बसून काय करतात हा विषय सुध्दा चर्चेचा झालेला आहे.त्यातही बांधकाम विभागातच नव्हे तर जिल्हा परिषदेत सुध्दा हा कंत्राटदार अति.मुकाअ यांचा नातेवाईक ठरतो काय अशा चर्चांना उधाण आले आहे.