रिलायंस कँसर केयर रूग्णालयाचे रविवारला उद्घाटन,गावच्या प्रथम नागरिकास डावलले

0
11

गोंदिया,दि.21: कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालय एँड मेडिकल रिसर्च इंस्टिट्युट मुंबईच्या वतीने गोरेगाव तालुक्यातील डव्वा परिसरात कँसर केयर रूग्णालयाची उभारणी केली असून या नवनिर्मित रिलायंस रूग्णालय-कँसर केयरचे उद्घाटन २३ डिसेंबर रविवारला सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन होणार असून विशेष अतिथी म्हणून खासदार प्रफुल पटेल, खा. सुप्रिया सुळे, पालकमंत्री राजकुमार बडोले, खा.मधुकर कुकडे, आ.गोपालदास अग्रवाल,आ.परिणय फुके, आ.विजय रहांगडाले,जि.प.अध्यक्षा सीमा मडावी,मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्षा वर्षाताई पटेल व माजी आ.राजेंद्र जैन आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.विशेष म्हणजे या उदघाटन सोहळ्याच्या पत्रिकेत ज्या ग्रामपंचायत हद्दीत हे रुग्णालय आहे,त्या ग्रामपंचायतीने उभारणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले त्या ग्रामपंचायतीच्या पहिल्या नागरिक असलेल्या सरपंचानाही स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सदर रूग्णालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्जीत राहणार असुन येथे उपलब्ध असणाºया मशीन व इतर सुविधा अनेक मोठया शहरामध्येसुध्दा उपलब्ध नाहीत. या नवनिर्मित रूग्णालयात टुबीम, वेरियन मार्फत इमेज गाइडेड रेडिएशन थेरेपी आणि रेडीओ सर्जरी करीता एक संयुक्त व्यवस्था जे निरोगी टिशु आणि शरीराला सोडुन गतीपुर्वक कँसर रोगाचे उपचार करतात अशी व्यवस्था या रूग्णालयात असणार आहे.हे रूग्णालय सुरू झाल्यामुळे गोंदिया-भंडारा जिल्हयासह जवळपासच्या परिसरातील तसेच मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यातील नागरीकांनासुध्दा कँसर सारख्या असाध्य रोगांवर उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. करीता आयोजित कार्यक्रमाला नागरीकां नी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिलायंस हॉस्पीटलच्या अध्यक्षा टीना अंबानी यांनी केले आहे.