क्षेत्राच्या विकासासाठी मी नेहमीच तत्पर : विनोद अग्रवाल

0
13

गोंदिया,दि.21 : चार वर्षापूर्वी जनतेने आपल्याला भरभरून आर्शिवाद दिले. त्या अनुषंगाने मागील चार वर्षापासून आपण सातत्याने क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्नशील असून विकास कामांसाठी पाठपुरावा करून ती कामे पूर्णत्वास आणली जात आहे. मात्र ही धडपड स्थानिक जनप्रतिनिधीच्या पोटात सूड निर्माण करीत असल्याची टिका भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जि.प. माजी उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केली.
तालुक्यातील तांडा येथे रस्ता व शालेय सुरक्षा भिंत बांधकामांच्या भूमिपुजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी सभापती जगदीशभाऊ बाहेकार, मुनेशजी रहांगडाले (सरपंच तांडा ), प्रमोद रहांगडाले ( ग्रा . प. सदस्य ), हंसराज राऊत, सौ पुष्पा कटरे , सौ मीरा उईके , पोलीस पाटील सोमवंशी जी, दुर्योधन रहांगडाले (तंटामुक्ती अध्यक्ष ) , सुभाष दहाटकर , सुरेंद्र संग परिहार (भाजप अध्यक्ष तांडा), चावडे जी, उत्तमचंद जी रहांगडाले, चैतराम पटले, माधवराव पटले, डॉ . दामाजी रहांगडाले,सौ. इंद्रायणी रहांगडाले (माजी सरपंच), नारायणजी भगत (माजी सरपंच), डिलनसिंग सोमवंशी (माजी सरपंच) , प्यारेलाल रहांगडाले (ग्रा. प. कर्मचारी) , हेमंत रहांगडाले, कुंजन रहांगडाले (सेवा सहकारी अध्यक्ष) , गेंदलाल रहांगडाले (सेवा सहकारी उपाध्यक्ष ), डॉ हेमराज पटले, बुधराम बावणे, गजानन येटरे , अनिल हरिणखेडे, कन्हैयालाल रहांगडाले, घनश्यामजी रहांगडाले आणि मोठ्या संख्येने ग्रामवासी उपस्थित होते.

यावेळी अग्रवाल पुढे म्हणाले केंद्र व राज्याची भाजप सरकार सातत्याने सर्वसामान्य नागरिकांचा जिवनमान उंचाविण्याचा प्रयत्न करीत आहे. यानुरूप अनेक लोक कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. प्रत्येक घरांचे स्वयंपाकघर धुरमुक्त झाले आहे. उज्वला गॅस योजना महिलांसाठी महत्वकांक्षी ठरली आहे. त्याच प्रमाणे गावागावात सरकाराच्या माध्यमातून विकासाची कामे होत आहे. त्यामुळे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गाव विकासाच्या मुख्यप्रवाहात जोडल्या जात आहे. परंतु विरोधी पक्षाचे जनप्रतिनिधी सर्व आपल्याच माध्यमातून होत आहे. हे दर्शविण्याचे काम होते आहे. ही बाब समजून घेण्याची गरज आहे. असे ही ते म्हणाले.