कब्रस्तानकरीता अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांना निवेदन

0
13

गोंदिया,दि.२१ः-येथील गोविंदपूर सुन्नी मुस्लीम जमातच्यावतीने फुलचूर येथील तलाठी साजा क्रमांक ३० येथील खसरा नं.४०३,आराजी ०-७० ही जागा सामुहिक मुस्लीम समुदायाच्या कब्रस्तानकरीता देण्यात यावी या मागणीचे निवेदन आज शुक्रवारला राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांना देण्यात आले.निवेदनात गोंदिया शहरात ७ हजार मुस्लीम समुदायाची जमात असून मोक्षधाम म्हणून सरकारच्यावतीने नियमाप्रमाणे वरील जागा कब्रस्तान म्हणून राखीव करण्यात आलेली आहे.परंतु उपविभागीय अधिकारी यांनी महसुल रेकार्डमधून सदर नोंदणी रद्द केल्याने सदर जागा कब्रस्तान करीता अद्यापही मिळालेली नाही.जागेची गरज असल्याने सदर जागा जमातीला मिळावी असे म्हटले आहे.निवेदन देतेवेळी इरफान सिद्दीकी,सय्यद इकबालुदिन,नईमभाई,नसीम भाई,फरहान मेमन,लतीफभाई,अफजल सहा,बबलू बेग,असलम भाई,रज्जुदिन सय्यद,अझहरभाई,अक्रम भाई,असफाग बेग जनता यांच्यासह इतर उपस्थित होते.तर  मुस्लिम अल्पसंख्यकांना 5% आरक्षणाच्या मागणीचे निवेदन रेस्ट हाउस गोंदिया येथे गोंदिया युवा कांग्रेस शहर अध्यक्ष नफीस जाफर भाई सिद्दीकी, खलील पठान, रियाज कच्छी, असलम शेख, रेहान, नवाब भाई, यासीन शेख, सरफराज भाई आदिंनी दिले.