लाखांदूर तालुक्यात सरपंच / उपसरपंच कार्यशाळा संपन्न

0
15
लाखांदूर  दि. २२ : :स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटी तथा पंचायत विभाग जिल्हा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने लाखांदूर तालुक्यातील सरपंच/ उपसरपंच यांची तालुकास्तरीय कार्यशाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात संपन्न झाली. कार्यशाळेची सुरूवात दिप प्रज्वलन व राष्ट्रसंत तुकडोजी महारात आणि वैराग्य मुर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटक संचालक नरेश खरकाटे (कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूर) व अध्यक्ष सौ. मंगलाताई बगमारे (पंचायत समिती लाखांदूर) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, नगराध्यक्षा सौ. भारतीताई दिवटे (नगरपंचायत लाखांदूर),उपसभापती शिवाजी देशकर (प.स.लाखांदूर), माजी सभापती नुतनजी कांबळे (पं.स. लाखांदूर), अध्यक्ष  जितेंद्र पारधी (सरंपच संघटना लाखांदूर), सचिव श्रीकांत दोनाडकर (कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूर), विस्तार अधिकारी कुरंजेकर (पं.स. लाखांदूर), तज्ञ मार्गदर्शक म्हणून बाळबुध्दे  यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेला सरपंच, उपसरपंच यांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी आपले विचार प्रकट करतांना ग्रामविकासाचा खरा शिल्पकार सरपंच हाच असून त्यांचे अधिकार, कर्तव्य, जबाबदार्‍या व नियम याबाबत सखोल माहिती मिळावी याहेतूने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यामागे संस्थेची भूमिका असल्याचे प्रतिपादन संस्थेचे सचिव प्रकाश बाळबुध्दे यांनी आपल्या प्रस्ताविकेतून केले. संस्थेच्या उपक्रमाबद्दल विविध वत्तäयांनी गौरवोद्गार काढले. उद्घाटन पर भाषणात बोलतांना नरेश खरकाटे यांनी ग्रामविकासामध्ये सरपंचाची भूमिका महत्वाची असून त्यासा’ी त्यांना अधिनियम, अधिकार यांची जाण असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
सरपंच कार्यशाळेच्या माध्यमातून स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटीचा उपक्रम स्तुत्य असून याच धरतीवर नगरपरिषद/नगरपंचायत पदाधिकार्‍यांसा’ी भविष्यात अशा कार्यशाळेचे आयोजन संस्थेमार्फत करावे अशी विनंती वजा सुचना नगर परिषद च्या नगराध्यक्षा सौ. भारती दिवटे यांनी केली.  सरपंच हा ग्रामविकासाचा अग्रदूत आहे. आपले अधिकार व कर्तव्य याबाबत त्यांनी सजग राहून गावाला प्रगती पथावर नेण्यासा’ी सदैव कृतीशील राहणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन सौ. मंगलाताई बगमारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.