रिलायन्स कॅन्सर हॉस्पिटलचा शुभारंभ उद्या शरद पवारांच्या हस्ते

0
16

गोंदिया,दि.22ः-कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालय व मेडिकल रिसर्च इंस्टिट्युट मुंबईच्या वतीने गोरेगाव तालुक्यातील डव्वा परिसरात  केयर हॉस्पीटल उभारण्यात आले आहे. या हॉस्पीटलचे उद्घाटन उद्या रविवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे, पालकमंत्री राजकुमार बडोले, टिना अंबानी, खा. मधुकर कुकडे, आ. गोपालदास अग्रवाल, आ.परिणय फुके, आ.विजय रहांगडाले, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, मनोहरभाई पटेल अडॅकेडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल व माजी आ. राजेंद्र जैन उपस्थित राहणार आहेत.
कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईद्वारा विविध सेवा प्रदान केल्या जात असून देशभरात अनेक ठिकाणी कॅन्सर केअर हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.2016 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोंदिया जिल्ह्यात कॅंसर केयर हास्पीटल सीएसआर(सामाजिकय दायित्व)  प्रफुल्ल पटेल व वर्षा पटेल यांच्यासोबत असलेले कौटुंबिक संबंध व त्यांच्या आग्रहाखातर सुरु करण्याची घोषणा समुहाच्या प्रमुख टिना अंबानी यांनी केली होती. याअंतर्गत गोंदिया-कोहमारा राज्यमार्गावरील डव्वा ग्रामपंचायत परिसरात सुसज्ज असे रिलायन्स कॅन्सर हॉस्पिटल तयार झाले असून, रविवार, २३ डिसेंबर रोजी शुभारंभ होणार आहे.  या हॉस्पिटलमध्ये कोट्यवधी रुपयांच्या अत्याधुनिक मशिन्स लावण्यात आल्या असून गाईडेड रेडिएशन थेरेपी व रेडिओ सर्जरीसारख्या अत्याधुनिक सेवा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. सदर रूग्णालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्जीत आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांना नागपुर व मुंबई येथे उपचारासाठी जाण्याची पायपीट सुध्दा कमी होणार आहे. या हॉस्पिटलचा लाभ गोंदिया व भंडारा जिल्ह्यासह मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील कॅन्सर रुग्णांना होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन रिलायन्स हॉस्पिटलच्या अध्यक्ष टीना अंबानी यांनी केले आहे.