करडी येथे खा.पटेलांच्या हस्ते बीडीसीसी बँकेच्या एटीएमचे लोकार्पण

0
6

मोहाडी,दि.24ः-भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना प्रथम प्राधान्य देवून शेतकर्‍यांच्या सुविधांबाबत व समस्यांबाबत नेहमीच झटत असून शासकीय योजनांचा फायदा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळवून दिला. त्यामुळे शेतकर्‍यांची खरी बँक ही जिल्हा मध्यवर्ती बँक असून बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे व त्यांचे संचालक मंडळ यांनी बँकेची धुरा चांगल्याप्रकारे सांभाळली असून त्यांचे याप्रसंगी कौतुक करावयास पाहिजे असे उद्घाटन भाषणा प्रसंगी खा. प्रफुल्ल पटेल यांनी करडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेच्या एटीएमच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटक खा. प्रफुल्ल पटेल होते. तर अध्यक्षस्थानी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.मधुकर कुकडे, विशेष अतिथी म्हणून माजी आ. राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री तथा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नानाभाऊ पंचबुध्दे, महासचिव प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय दलाल, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, माधव बांते, जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, माजी आ. अनिल बावनकर, रामराव कारेमोरे, भाऊराव तुमसरे, राजु कारेमोरे, राजु माटे, आशिष पातरे, रिता हलमारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा करडीच्या एटीएमचे उद्घाटन व जनजागृती मेळावा दि. २४ डिसेंबर रोजी जिल्हा बँकेच्या करडी शाखेच्या समोरील पटांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उद्घाटन भाषणा प्रसंगी खा . पटेल पुढे म्हणाले, देशात ६० टक्के लोक हे शेतीवर अवलंबून आहे. तर जिल्ह्यात ८०  ते ८५ टक्के लोक शेतीच्या भरोशावर आहेत. जनू काही जिल्ह्याचा ‘श्वास’ म्हणजेच शेतकरी आहे. त्यांच्यासा’ी जेवढे कराल तेवढे कमी आहे. म्हणून त्यांचा विचार पहिल्यांदा करायला हवा. आपण विकासाच्या बाबतीत चर्चा करतो, पण प्रामुख्याने त्या विकासाच्या बाबतीत शेतकर्‍यांना विसरतो. असे न होता, प्रामुख्याने शेतकर्‍यांवर लक्ष केंद्रीत करायला हवे तेव्हाच जिल्ह्यासह देशाचा कारभार सुरळीत चालेल, असे प्रसंगी बोलले. विद्ममान राज्य व केंद्रातील सरकारे ही धानउत्पादक शेतकरी विरोधी असल्यामुळेच धानाला भाव मिळत नसल्याची टिका केली.तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याने सर्वसामान्य व्यक्तीचे वैयक्तिक अधिकारही हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची टिका केली.कार्यक्रमा प्रसंगी मंचकावर असणार्‍या अतिथींनीही आपले मत प्रसंगी व्यक्त केले.
बँकेच्या वतीने बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे प्रसंगी म्हणाले की, बँक शेतकर्‍यांकरीता व बँकेच्या ग्राहकांकरीता नेहमीच सकारात्मक भूमिकेत काम करीत असते. एकूणच शेतकर्‍यांची बँक म्हटंल्यावर ग्रामीण भागातील शाखेंमध्ये होणारी गर्दी व ग्राहकांना बँक सेवेचा लागणारा वेळ या सर्व बाबी लक्षात घेवून जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्रत्येक शाखेत एटीएम केंद्र सुरू करण्याचा मानस केला आहे. या सेवेचा शेतकरी बाधंवांनी लाभ घ्यावा असे प्रसंगी बोलले.कार्यक्रमाचे संचालन मोहाडी तालुका राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष वासु बांते यांनी केले तर आभार महादेव पचघरे यांनी केले.आयोजनासाठी ,महेन्द्र शेंडे, वासु बान्ते,  विठल कहालकर, किरण अतकरी, देवचंद ठाकरे, रेखाताई ठाकरे,भाऊराव तुमसरे, के के पंचबुधे, श्रीकृष्ण पडोळे, सरिता चौरागड़े, नीलिमा इलमे, धनराज चौधरी, श्रीधर हटवार, विजय पारधी, देवीसिंह सव्वालाखे, अलकाताई बांते, झगडू बुधे, यांनी सहकार्य केले.