शेतकर्‍यांसाठी नवीन तंत्रज्ञान विषयक कार्यशाळेचे आयोजन करावे – सुनिल फुंडे

0
10
साकोली येथे निशुक्ल हृदयरोग तपासणी शिबिर
साकोली,दि.26 : स्मार्ट व्हिलेज डेव्हलप्मेंट सोसायटी साकोली, याशना हार्ट केअर आणि सहयोग सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रकाश पर्व’ सिव्हील वार्ड साकोली येथे नुकतेच निशुल्क हृदयरोग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे म्हणाले की, स्मार्ट व्हिलेज डेव्हलेप्मेंट सोसायटीने आयोजित केलेल्या हृदयरोग निदान शिबीर हे कौतुकास्पद असून भविष्यात शेतकर्‍यांसाठी नवीन तंत्रज्ञान विषयक कार्यशाळा आयोजित कराव्यात त्या कार्यशाळेसाठी जिल्हा मध्यवर्ती बँक मदत करेल, असे प्रतिपादन व्यक्त केले.
शिबीराचे उद्घाटन व दिप प्रज्वलन  तसेच भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून साकोलीचे आ. बाळा काशीवार उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा सहकार महर्षी सुनिल फुंडे यांची उपस्थिती लाभली. तर विशेष अतिथी म्हणून म्हाडा नागपूरचे सभापती तथा भाजपा जिल्हाध्यक्ष तारीक कुरेशी, सुप्रसीध्द वैद्यकीय चिकित्सक अधिकारी  डॉ. राजेंद्र कापगते, डॉ. वासुदेव लांजे, डॉ. विनायक रूकमोडे, डॉ. देवेश अग्रवाल, तरूण मल्लानी, संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अन्ना परशुरामकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
या हृदयरोग शिबिरामध्ये ब्लड प्रेशर, शुगर, ईसीजी इत्यादी तपासण्या निशुल्क करण्यात आल्या. जवळपास ५०० रूग्णांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या प्रसंगी वरीष्ठ हृदयरोग विशेष तज्ञ व सर्जन डॉ. विवेक लांजे यांच्या चमुने तपासणी विषयक कार्य पार पाडले. चमुमध्ये डॉ. विजया लांजे, डॉ. रोहीत, डॉ. समीर गहाने, यश फार्मा व सहयोग हॉस्पीटल गोंदिया येथील कर्मचारी वृद उपस्थित होते. कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचे सचिव प्रकाश बाळबुध्दे यांनी आयोजना मगाील भूमिका व बदलत्या जिवन शैलीमध्ये होणार्‍या आजारांचे निदान होवून उपचार करणे शक्य व्हावे म्हणून या शिबिराचे आयोजन केल्याचे मत व्यक्त केले आहे.
डॉ. विजया लांजे म्हणाल्या की, आजच्या बदलत्या जिवनशैलीमुळे हृदयरोगाच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे समाजात याबद्दलची जनजागृती आवश्यक असल्याचे मत व्यक्त करून अशा शिबिरांना प्रत्येक जिल्हापरिषद क्षेत्र निहाय  अशा शिबिरांचे आयोजन करावे, असे मत व्यक्त केले.उद्घाटनीय भाषणात आ. बाळा काशीवार म्हणाले की, या संस्थेने मोलाचे आयोजन करून आयोजन सुव्यवस्थेत पार पाडले. त्यामुळे या संस्थेचे भरभरून कौतूक केले. तर विशेष अतिथी म्हणून पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांची अंत्योदयाची संकल्पना आचरणात आणणारी ही संस्था असल्याचे मत म्हाडा नागपूरचे सभापती तारीक कुरेशी यांनी मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार अ‍ॅड. दिलीप कातोरे यांनी केले. या कार्यक्रमाला साकोली परिसरातील मोठया प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.