अग्रवालांनी केली बायपास रस्त्यासह प्रगती कॉलनीची पाहणी

0
7

गोंदिया,दि.05 : गोंदिया शहराच्या पूर्वी बायपासला लागून असलेल्या प्रगती कॉलनी येथील निवासी गोंदिया शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष नफिसभाई सिद्दीकी व अन्य नागरिकांनी नवीन बायपास मार्गाने प्रगती कॉलनीपर्यंत पोहोचणाऱ्या मार्गाच्या निर्माणाकरिता आमदार गोपालदास अग्रवाल यांना विनंती करण्यात आली होती. तेव्हा नागरिकांच्या भावना लक्षात घेता आमदार अग्रवाल यांनी बायपास रस्त्यासह प्रगती कॉलनीची पाहणी केली.यावेळी त्यांच्यासोबत नगर युवक काँग्रेस अध्यक्ष नफिसभाई सिद्धिकी, रोहित मेंढे, सिन्नू राव, सिंगनजुडे, रहिले, गीता रहिले, हरीश भगत, टी.एम.राव, टेंभुर्णीकर, अफरोज खान, राजेंद्र कावळे, अनिल कापसे, नागेश नेवाट, डॉ. भगत, अनिल मेश्राम, आशिष श्रीवास्तव, आनंद, लाला खान, फारूखभाई, टी.एम.चुऱ्हे, अमर कापसे, मुसरूभाई, असाटी आदी उपस्थित होते.

प्रगती कॉलनीपर्यंत पोहोचणाऱ्या मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी उपलब्ध करून दिला आहे. प्राप्त माहितीनुसार प्रगती कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावर राजमार्ग विभागाने पर्यायी बायपास मार्ग बनविण्याचा प्रस्ताव तथा जमिनीवर दगडांची मार्किंग केल्या जात असल्यामुळे नागरिकांमध्ये कॉलनीकडे जाणारा रस्ता बंद होऊन अनेक घर तोडल्या जातील अशी भीती निर्माण झाली होती. या संदर्भात आमदार गोपालदास अग्रवाल यांनी पाहणी करण्याची विनंती नागरिकांनी केली होती. तेव्हा अग्रवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जाऊन स्थितीची पाहणी केली. दरम्यान ते अधिकाऱ्यांना म्हणाले, जेव्हा रस्त्याची दुरुस्ती व शासनाकडून आधी अधिग्रहित शासकीय जमीन उपलब्ध असताना घराची तोडफोड करून नवीन रस्त्याची गरज नसल्याचे सांगितले. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही त्यांच्या गोष्टीचे समर्थन करून विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांना ही बाब अवगत करून देण्याचे सांगितले. .

..