गोंदिया-गेल्या २ व ३ मार्चला आलेल्या अवकाळी पावसानंतर १६ मार्चला पुन्हा आलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील खरीप व रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त शेतकèयांना राज्यसरकारने तत्काळ मदत करावी या मागणीचे निवेदन गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे,गंगाधर परशुरामकर,कुंदन कटारे,चुन्नीभाऊ बेंदरे,जगदीश बहेकार,नरेंद्र तुरकर,राजेंद्र जैन,बाळा हलमारे,छोटुभाऊ पटले,तिर्थराज हरिणखेडे,आखिलेस सेठ,भुवन रिनाईत,मुरली लिल्हारे,रामु चुटे,पुरणलाल उके,रवींद्र हेमणे,रामेश्वर ठकरेले,गंगाराम कापसे आदी उपस्थित होते.