मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम

0
26

वर्धा,दि.23ः- आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंञाटी नर्सेस युनियनच्यावतीने २० जानेवारी रोजी आयटक कार्यालय बोरगांव मेघे येथे कंत्राटी नर्सेस संघटनेचा विभागीय मेळावा पार पडला.आयटक राज्य उपाध्यक्ष काँ दिलीप उटाणे यांच्या अध्यक्षतेखाली काँ हौसलाल रंहागडाले,मिना पारधी,बबीता रंहागडाले( गोंदिया),संगीता रेवडे, सुशीला थोटे, स्वाती धोंगडी, मंदा राठोड ( वर्धा ), संगीता वाणी ,वनिता सयाम ( अमरावती) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या मेळ्याव्यात मार्गदर्शन करतांना प्रमिला मेश्राम यांनी मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी वेळोवेळी केेलेल्या भाषणासंह आश्वासनांची अमलबंजावणी करावी असे विचार व्यक्त केले.
१४ वर्षापासून कंञाटी नर्सेस जेवढे काम नियमित आरोग्य सेविका करते तेवढेच काम कंञाटी काम करतात मग आम्हाला मानधन का? जेवढ्या सुखसोई त्यांना मिळतात कंञाटी नर्सेसनां कधी मिळणार अशा प्रश्नही त्यांना यावेळी उपस्थित केला. मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी अनेक वेळा भाजपाची सत्ता आल्यास अवघ्या दोन महिण्यात आरोग्य विभागातील कंञाटी कर्मचाऱ्यांना शासन / जि.प सेवेत सामावून घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते.परंतु चार वर्षाचा काळ लोटला असतानाही शब्दावर कायम राहिले नसल्याची टिका केली.
संगीता रेवडे यांनी कंञाटी नर्सेस सोबत शासन सावत्र व्यवहार करीत असून २००५ पासून आरोग्य सेविका व डाटा आपरेटर यांना ५ हजार सारखेच वेतन होते. शासनाने कंञाटी कर्मचाऱ्यांना २०% वाढ दिली .त्यानुसार डाटा आपरेटर यांना आज १८०००/- रुपये दरमाहा वेतन मिळत आहे .परंतु आरोग्य सेविकांना फक्त ११ हजार वेतन मिळत आहे. त्यामुळे आरोग्य सेविकेच्या वेतनातील तफावत दुर करावे अशी मागणी करीत आहोत .शासनाच्या कोणत्याही विभागात आम्हाला शैक्षणिक पाञतेनुसार सामावून घ्यावे असेही त्या म्हणाल्या. यावेळी प्रिया कांबळे,सरोज वानखेडे, सिमा मेहरा, सुकेशिनी कांबळे, मिनल वानखेडे, सारिका मेंढे, मिनाक्षी भगत, अर्चना दारुंडे, वनिता गजाम, शोभा करनाके, शिला मडावी इत्यादीनी विचार व्यक्त केले.संचालन जयश्री ढोले यांनी केले तर आभार सरला पारिसे यांनी मानले.