जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने रॅलीद्वारे मतदार जागृतीचा संदेश

0
17

वाशिमदि. २५ : राष्ट्रीय मतदार जागृती दिवसानिमित्त आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार कार्यालय येथून उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली.यावेळी तहसीलदार बळवंत अरखराव, नायब तहसीलदार दीपक दंडे, एल. आर. बनसोडे, साहेबराव नप्ते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तहसीलदार कार्यालय येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाका, जिल्हाधिकारी कार्यालय व पुन्हा तहसीलदार कार्यालय येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.रॅलीमध्ये राजस्थान आर्य महाविद्यलय, बाकलीवाल कनिष्ठ महाविद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, रेखाताई राष्ट्रीय विद्यालय व शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होवून मतदार जागृती केली.

अधिकारी, कर्मचारी यांना मतदार दिनाची शपथ

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय व इतर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी लोकशाही परंपरांचे जतन करण्याची व निःपक्षपाती, शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य कायम राखून निर्भयपणे मतदान करण्याची शपथ घेतली. जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित या कार्यक्रमात उपस्थितांना मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांचा व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला. तसेच मतदार जागृती फोरमची माहिती देण्यात आली.

विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

मतदार जनजागृतीसाठी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘लोकशाही व मतदार’ या विषयावरील निबंध, वक्तृत्व स्पर्धा तसेच रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओ, पर्यवेक्षकांचा सत्कार

मतदार नोंदणी कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणारे पर्यवेक्षक आर. जी. गरपाल, एन. जी. उईके व बीएलओ सौ. एस. पी. दुरतकर, एस. पी. राजूरकर, संतोष काळे, श्रीराम चोपडे, बबन काकडे यांचा यावेळी प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.