पत्रकार भवनाच्या नितीन नियोजित जागेवर अनधिकृत बांधकाम

0
13
सालेकसा,दि.29ः- मागील दोन वर्षापासून आमगाव खुर्द येथील गट क्रमांक 235 आराजी 1.60 हेक्टर आर जमिनीपैकी 0.01 हेक्टर आर जमिनीची मागणी सालेकसा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवन करिता करण्यात आली होती. त्या अनुषंगाने तत्कालीन ग्रामपंचायतीचे ना हरकत व इतर दस्तऐवज सालेकसा तालुका प्रशासनाकडे सादर करण्यात आले. मात्र त्यानंतर नगरपंचायत अस्तित्वात आल्याने नगरपंचायतीकडे रीतसर अर्ज करण्यात आले आहे. परंतु त्या जमिनीवर राजकीय सूडबुद्धीने अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केले जात आहे. ते अतिक्रमण काढण्यात यावे अशा मागणीचे निवेदन सालेकसा तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुका प्रशासनाला देण्यात आले. शासन निर्णयानुसार तालुकास्तरीय पत्रकार भवन असणे गरजेचे आहे त्यानुरूप सालेकसा तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात जमिनीची मागणी करण्यात आली होती. त्यातच आमगाव खुर्द येथील गट क्रमांक 235 आराजी 1.60 हेक्टर आर जमिनीपैकी 0.01 हेक्टर जमिनीचे प्रस्ताव तयार करण्यात आले. प्रस्तावासोबत तत्कालीन ग्रामपंचायतीचे ना हरकत ठराव, वनविभागाचे ना हरकत व महसूल विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र जोडण्यात आले होते. मात्र आमगाव खुर्द ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत समावेश झाल्याने त्यासाठी सालेकसा नगरपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी २८ नोव्हेंबर २०१८ रोजी रीतसर अर्ज करण्यात आले परंतु अद्याप पर्यंत नगरपंचायतीकडून अर्जावर विचार करण्यात आला नाही. तर दुसरीकडे त्या नियोजित जागेवर राजकीय सूडबुद्धीने अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम सुरू करण्यात आले हे बांधकाम काढण्यात यावे अशा मागणीचे निवेदन तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे.