गोसेतील प्रलंबित कामासाठी आज नागपूरात बैठक

0
8

भंडारा,दि.01ः- जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत प्रलंबित कामाला गती देण्यासाठी आ. परीणय फुके यांच्या प्रयत्नामुळे विदर्भ पाटबंधारे विकास महामंळाद्वारे १फेब्रुवारी रोजी बैठक ठेवण्यात आली आहे.भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाअंतर्गत अनेक कामे प्रलंबित आहे.या कामांना गती देण्यासाठी गोंदिया भंडारा क्षेत्राचे विधान परिषद सदस्य परीणय फुके प्रयत्नशील आहे.यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा पाठपुरावा केला.अखेर त्यांच्या विनंती वरून १ फेब्रुवारी रोजी बैठक घेण्याचे निर्देश अधीक्षक अभियंता यांनी कार्यकारी अभियंता यांना एका पत्रा व्दारे दिले.यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

धारगाव उपसा सिंचन टप्पा १व २ गोसेखुर्द प्रकल्पात समाविष्ट करणे, लोहारा पेवठा जि. भंडारा येथे उपसा सिंचन योजना तयार करण्याबाबत , दवडीपार (बेला) ता. भंडारा येथे ९८ घरांचे आंशिक पुनर्वसन करणे, बरोडी ता. भंडारा गावाचे पुनर्वसन करणे, पिंडकेपार ता. भंडारा गावाला भूखंड मिळणे, तिड्डी ता.भंडारा गावाचे पुनर्वसन करणे, बोरगाव ता. भंडारा येथील २२ घराचे न मिळालेल्या पैशाचा मुद्दा निकाली काढणे.आदी प्रलंबित प्रश्नां गती देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.