कठीण परिश्रमानेच अपेक्षित फळ मिळते : वर्षा पटेल

0
23

गोंदिया,दि.04 : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमात तसेच क्रीडा क्षेत्रातसुद्धा भाग घ्यायला हवा आणि आपले व्यक्तिमत्त्व घडवावे, तसेच परिसरातील बचतगटाच्या महिलांनासुद्धा वर्षा पटेल यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी क्षेत्रातील बचत गटातील महिलांनी विविध स्टॉल लावले होते. त्यांचे निरीक्षणसुद्धा वर्षा पटले यांनी केले आणि महिलांनी नुसतं चूल आणि मूल यातच न राहता स्वत:च्या पायावर उभे राहून जीवनात आपली प्रगती साधावी, असे मत मांडले.

गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचालित जी.ई.एस.हाय. एव कनिष्ठ महाविद्यालय दासगाव येथे ३१ जानेवारीला वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मनोहरभाई पटेल ॲकॅडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य रजनी गौतम ह्या होत्या. मंचावर विशेष अतिथी म्हणून खुशबू टेंभरे, रामराज खरे, प्रमिला करचाल, गोविंद तुरकर, रानू नशिने, माया कोल्हे, शीला कुंजाम, त्रिवेणी हनवते, संगीता रहांगडाले, लेखा तुरकर, पुरुषोत्तम डोहरे, अंचल गिरी, ओ.एल. मेश्राम, मधू हनवते, लतीफभाई शेख, सतीश कोल्हे, धीरज नशिने, ओमदास नंदेश्वर आदी उपस्थित होते. .

याप्रसंगी कार्यक्रमाचे औचित्य साधून ज्येेष्ठ नागरिक तुंडीलाल तुरकर, गुणीराम सेवईवार, प्रगतीशील शेतकरी हौसलाल बिसेन, त्रिवेणी तुरकर, युवा किसान डोहरे, माजी विद्यार्थी टेंभरे यांचासुद्धा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य ए.ओ. श्रीवास्तव यांनी मांडले. संचालन अजय रहांगडाले यांनी केले तर आभार एस.एल. हनवते यांनी मानले. यशस्वितेसाठी जे.एन. बिसेन, पी.डी. बसेने, एच.एन. गौतम, एच.एन. लिल्हारे, एन.एस. अग्रवाल, इस्सुराव, एन.एल. गायकवाड, प्रीती निमावंत, श्यामकुवर, अनुजा बुरांडे तसेच शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. .