पालकमंत्र्यांच्या अश्वासनाने नागेपल्ली ग्रामस्थांचे उपोषण मागे

0
12

अहेरी,दि.05ःःआदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते जल प्राशन करून मागील ४ दिवसांपासून सुरू असलेले नागेपल्ली येथील महिला ग्रामस्थांचे निवाऱ्या संदर्भात असलेले उपोषण ३ फेब्रुवारी २०१९ रोजी मंत्रीमहोदयांशी झालेल्या समाधानकारक चर्चेनंतर मागे घेण्यात आले.उपोषण कर्त्यांशी संवाद साधताना पालकमंत्री म्हणाले, मी तुमच्यासाठी आणि तुमच्या मुळेच आज या पदावर आहे. तेव्हा तुमच्या रास्त मागण्या पूर्ण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे, असे मी मानतो. त्यामुळे कुणीही काळजी करू नये. तुम्हाला यथा योग्य राहण्याची व्यवस्था करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पण उपोषणाच्या नावावर होत असलेले गलिच्छ राजकारण थांबवा. माझ्याकडे आपल्या सर्वांची माहिती आहे. त्याची योग्यरित्या पुनः पडताळणी करून जे खऱ्या अर्थाने गरजू आहेत त्यांच्या मागणीला न्याय देण्यासाठी मी यथा योग्य सर्वतोपरी प्रयत्न करीन असे आश्वासन देतो.आपल्या निवाऱ्याचा प्रश्न निकाली काढण्याची मी ग्वाही देतो, अश्याप्रकारे मंत्रीमहोद्यांशी झालेल्या समाधानकारक सु-संवादा नंतर उपोषण कर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.यावेळी उपोषणार्थी सोबतच परिसरातील नागरिक तसेच विविध राजकीय पक्षांचे अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.