अर्जुनी मोर तालुक्यातील दाभना गाव तंबाखूमुक्तीच्या वाटेवर

0
26

अर्जुनी-मोरगाव(संतोष रोकडे)दि.0७ःः तालुक्यातील दाभना हे गाव पुढे आले आहे. गावातील जनता निरोगी राहावी व संस्कारक्षम विद्यार्थी घडावेत यासाठी दाभना गावाने तंबाखू विक्री बंदी गावाचा ठराव घेतला आहे. गावात तंबाखू विक्री होणार नाही असा संकल्प करण्यात आला आहे.तंबाखू नियंत्रण पथक जिल्हा व तालुका पथकाकडून करण्यात येणाºया कारवाईमुळे प्रभावित होऊन अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दाभना ग्रामपंचायतीने तंबाखूमुक्त गाव करण्याचा ठराव घेतला आहे. गावातील विद्यार्थी व तयार होणारी पिढी संस्कारक्षम व्हावी या उद्देशातून गाव तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला.
जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अमरीश मोहबे, अर्जुनी-मोरगावचे पोलीस निरीक्षक कुंभरे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा व तालुका तंबाखू नियंत्रण पथकाने अर्जुनी-मोरगाव तालुक्यात तंबाखू विक्री करणाºया १५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.५ फेब्रुवारीला करण्यात आलेल्या कारवाई करणाऱ्या पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर बुराडे, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाण, झामेश गायकवाड, विलास कारेवार, जिल्हा सल्लागार डॉ.शैलेश कुुकडे, सुरेखा आझाद, एन.मेश्राम व संध्या शंभरकर यांचा समावेश होता

याप्रसंगी खुली तंबाखू व खर्रा न विकणे, १८ वर्षाखालील व्यक्तींना तंबाखू न विकणे, “१८ वर्षाखालील व्यक्तींना तंबाखू विकणे कायद्याने गुन्हा आहे “असे फलक लावण्याच्या सूचना दुकानदारांना देण्यात आल्या. तंबाखू नियंत्रण पथकाद्वारे केल्या जाणाऱ्या कारवाहीमुळे उत्साहित होऊन तंबाखूमुक्त निरोगी गाव व गावातील विद्यार्थी व येणारी पिढी सुसंस्कारित व्हावी या उद्देशाने अर्जुनी मोर तालुक्यातील दाभना गावातील ग्रामपंचायतीने ठराव घेऊन तंबाखूमुक्त गाव करण्याचा स्तुत्य निर्धार करीत जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला. याचा फायदा निश्चितच गावातील जनतेला होईल व येणारी पिढी सुदृढ व्हायला मदत होणार आहे.जनतेने व ग्रामपंचायतीने गावाच्या व येणाऱ्या पिढीच्या भल्यासाठी तंबाखू मुक्तीचा ठराव करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.