लोकशाही जतन करण्यासाठी सत्ता परिवर्तन गरजेचे- मनोहर चंद्रिकापुरे

0
21

अर्जुनी मोरगाव ,दि.0७- : :- सत्ता परिवर्तनाच्या सारीपाटात कार्यकर्ता जिव की प्राण असतो,त्याचप्रमाणे राजकीय संघटनेचेही महत्व असते.राजकीय संघटनेच्या जिवनचक्रात कार्यकर्ता महत्वाचा असतो.संघटना कोणती व कशी याचे जिवन चित्र म्हणजे कार्यकर्ता  होय.कार्यकर्ता जन्मताच कार्यकर्ता म्हणून जन्माला येत नसतो तर तो तयार करावा लागतो असे विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.ते तालुका युवक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अर्जुनी मोर च्या वतीने गोठणगाव येथे आयोजित सभेत अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी  युवक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष किशोर तरोणे , लोकपाल गहाणे तालुका अध्यक्ष , योगेश नाकाडे तालुका युवक अध्यक्ष, सुशिला हलमारे, रतिराम राणे, ञ्यबंक झोडे, गजानन कोवे,आर. के. जांभुळकर, अजय शहारे, ईत्यादि मान्यवर उपस्थित होते. चंद्रिकापुरे पुढे म्हणाले की, जर आपण भारत सरकार व राज्य सरकारची चुकीचे धोरण गावा गावातील जणते पर्यंत पोहचावे लागेल. नाकर्ता सरकार चे अपयश नागरिकांना समजावून सांगावे लागेल. 17 रुपये दिवसाला देऊन शेतक-यांच्या तोंडला पाने पुसले. युवकांना फसवे आश्वासन देऊन त्यांचे आयुष्य उध्वस्त करायचे काम ह्या सरकार ने केले आहे. ज्या प्रमाणे शेतकरी आत्महत्या करतात त्या प्रमाणे सरकार च्या नाकर्तेपणामुळे बेरोजगार युवक आत्महत्या करतील असे विचार मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले. किशोर तरोणे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, वन बुथ टेन युथ हे मोहिम प्रत्येक गावात पोहचली पाहिजे.