समाजाने सविंधानिक हक्कासाठी संघटित व्हावे-बबलू कटरे

0
13

चक्रवर्ती राजाभोज जयंती बिरसी येथे उत्साहात
आमगाव,दि.12-भारतीय सविंधानाने दिलेल्या मुलभूत अधिकाराचा वापर करीत समाजातील युवकांना प्रशासनिक सेवेमध्ये अधिकाधिक संधी उपलब्ध होण्यासोबतच शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी ओबीसीच्या लढ्यामध्ये समाजाने सहभागी व्हावे असे आवाहन गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे यांनी केले.ते तालुक्यातील बिरसी येथे राजाभोज जंयती उत्साहात साजरी करण्यात आली त्ङ्माप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
गावात सकाळच्या सुमारास शोभायात्रा काढण्यात आली.त्यानंतर चक्रवर्ती राजाभोज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.यावेळी गावातील इयत्ता १० व १२ वी च्या गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष इंजि.मुरलीधर टेंभरे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभेचे संघटन सचिव खेमेंद्र कटरे,गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,पवार प्रगतीशील मचचे सचिव प्रा संजिव रहागंडाले,एन.के.अंबुले,डी.के.भगत,रेखलाल टेंभरे,शितलाबाई बिसेन,सुमन पटले,अंजुबाई बिसेन,कविता रहागंडाले आदी उपस्थित होते.
ते पुढे बोलतांना आपला समाज आजही ग्रामीण भागात मोठया संख्येने वास्तव्यास असून आपण नोकरीच्या निमित्ताने बाहेर येऊन आपल्या बोलीभाषेसोबतच सामाजिक दायित्वाकडे केलेले दुर्लक्षामुळेच आज आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून दिलेल्या संविधानिक अधिकारापासून वंचित राहिलो आहे.तर सqवधानामुळेच आज आपल्या समाजातील महिलांना शिक्षण,संपत्तीसह सर्वच क्षेत्रात समान अधिकार मिळाले आहेत.परंतु या गोष्टीची जाणिव आपणाला कुणीही न करुन दिल्याने आणि आपल्या इतिहासाकडे लक्ष न दिल्याने आजचा युवक या गोष्टीपासून अनभिज्ञ आहे.तेव्हा आपण सर्वांनी आपल्या मूलभुत अधिकाराची जाणिव करण्यासाठी ओबीसीच्या लढ्यात सहभागी होऊन समाजाला सशक्त करण्यात सहकार्य करावे असे म्हणाले.
यावेळी टेंभरे यांनी समाजाने खर्चिक प्रथा बंद करावे,मृत्यूभोज टाळावे आणि समाजाने शिक्षणाला महत्व द्यावे असे विचार मांडले.अध्यक्ष स्थानावरून बोलतांना कटरे म्हणाले की समाजाने राजकिय व प्रशासकीय सत्ता मिळविण्यासाठी संघटित होण्याची वेळ आली आहे.आपला समाज मुर्तीपुजक नसल्याने अवंडबर टाळावे यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे विचार व्यक्त केले.यावेळी संजय रहागंडाले,एन.के.अंबुले,डी.के.भगत,कविता रहागंडाले यांनीही विचार व्यक्त केले.त्यापुर्वी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनीनी लेझीमच्या माध्यमातून व स्वागतगिताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. आयोजनासाठी राजाभोज बहुउद्देशीय संस्था बिरसी,महिला संगठन व क्षत्रिय पोवार समाज संघटन बिरसीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.