प्रसार माध्यमांची भूमिका मोलाची: जि.बलकवडे

0
29

गोंदिया,दि.12: भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचने प्रमाणे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट कार्यप्रणाली जनसामान्य पर्यंत पोहचविण्याचे कार्य प्रसार माध्यमांच्यावतीने सूरु आहे. ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या प्रसिध्दी व्यापक प्रमाणात असली तरी प्रसार माध्यमांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅट संदर्भात माहिती होणे आवश्यक असून जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रसार माध्यमांसाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रत्यक्ष तपासणी प्रशिक्षण कार्यक्रम आज दि. 12 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले की येत्या निवडणूकी साठी जिल्हा प्रशासन सज्ज असून 1498कॅन्ट्रोल युनिट, 2710 बॅलेट युनिट, 1499 व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. तसेच अतिरीक्त मागणी करण्यात आली असून लवकरच मागणीनूसार ईव्हीएम-व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनिट उपलब्ध होणार आहे. तसेच संपूर्ण निवडणूक प्रकियेत प्रसारमाध्यमांची भूमिका मोलाची असल्याचे मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमात कॅन्ट्रोल युनिट, बॅलेट युनिट, तथा व्हीव्हीपॅटच्या कार्यप्रणाली  संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थितांनी प्रत्यक्ष मतदान करुन कंट्रोल युनिटचे संपूर्ण कार्यप्रणालीचे अनुभव घेतले असून समाधान व्यक्त केले. या ठिकाणी मतदान प्रक्रिया, मतचाचणी प्रक्रिया, मतमोजणी प्रक्रिया करण्यात आली. तसेच ज्यांना मतदान करण्यात आले होते त्यांनाच मतदान झाले कि नाही या बाबत खात्री पटवून देण्यात आली. या नंतर उपस्थितांच्या प्रश्नांची व मनातील शंकाचे निरसन अपर तहसिलदार के.डी मेश्राम यांनी केले. जिल्हा स्तरावरील पथकांनी ईव्हीएम व्हीव्हीपॅट बद्दल प्रत्यक्ष मतदान करुन माहिती दिली.  या वेळेस झालेल्या मतदान व मतदानाच्या पावत्या सर्वांसमक्ष मोजणी करुन दाखविण्यात आले. तसेच ईव्हीएम व्हीव्हीपॅटची कार्यपद्धतीचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांची शंका-समाधान करण्यात आले.सदर कार्यक्रमात प्रामुख्याने निवडणूक उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, ना.तह हरीशचंद्र मडावी, नोखलाल कटरे, अमित पाथोडे, अमोल गजभिये, पथक प्रमुख बी.बी. भेंडारकर, तलाठी बी.आर. बिसेन, एम.एस. गेडाम, व निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी तथा प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी  उपस्थित होते.