आमदारांची कमाल… यात्रा कचारगडची,बैठक नागपूरात

0
40

गोंदिया,दि.१५~गोंदिया जिल्ह्यातील कचारगड येथील यात्रेदरम्यान आयोजित अटल महाआरोग्य शिबिराच्या आयोजनाकरिता नागपूरी आमदारांने चक्क मुख्यमंत्र्याच्या नावावर नागपूरातील रवीभवनात आज आढावा बैठक घेण्यात आली.विशेष म्हणजे ही बैठक अर्धा ते एक तासातही आटोपली.अर्धा एक तासासाठी गोंदिया जिल्हा मुख्यालयातील किमान 40 व सालेकसा पंचायत समिती कार्यालय,तहसिल कार्यालयासह विविध विभागाचे 15 ते 20 अधिकार्यांना पाचारण करण्यात आले होते.ही बैठक नागपूर निवासी भंडारा-गोंदियाचे विधानपरिषद सदस्य डाॅॅ.परिणय फुके यांनी आयोजित केली होती.एकमेव नागपूर निवासी आमदारांनी चक्क गोंदिया जिल्ह्यातील 60-70 अधिकार्यांना नागपूरला बोलावणे कितपत योग्य आहे.

एका शासकीय वाहनाला नागपूर येण्या जाण्यासाठी 1500 ते 2000 रुपयाचा डिझेल व पेट्रोल खर्च येतो.किमान 20 ते 25 अधिकारी हे आपआपल्या शासकीय वाहनानेच नागपूरला गेले असतील तर किमान 30 ते 40 हजार रुपयाचा डिझेल खर्च त्यानंतर त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च वेगळा हा खर्च शासकीय तिजोरीतूनच जाणार आहे जेव्हा की हीच बैठक गोंदिया किवा सालेकसा येथे घेतली जाऊ शकत होती.परंतु तसे करण्यात आले नाही.उलट ज्या काही खासगी संस्थांना या महाआरोग्य शिबिरात काम देण्यात आले आहे,त्यांच्यावरही शासकीय पैसा खर्च होणारच आहे,मग त्या संस्थेचे पदाधिकारी गोंदिया/सालेकसाला येऊ शकत नव्हते का हा सुध्दा प्रश्न उपस्थित झालेला आहे.

परंतु सुत्राकंडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर निवासी आमदारांनी फक्त मुख्यमंत्र्याच्या जवळचा आणि मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार असल्याचे सांगून  नागपूरात १५० किलोमीटरवर ही आढावा बैठक घेतल्याचे बोलले जात आहे.या बैठकिच्या माध्यमातून शासकिय निधीची विल्हेवाट लावली गेली म्हणायला काहीही हरकत नाही.त्यातही काही संस्थाच्या हितासाठी ही बैठक नागपूरात घेतली गेल्याची चर्चा आहे.जिल्हाधिकारी व मुकाअसह अनेक अधिकारी गैरहजर असल्याने नागरिकांना आल्यापावली परत जावे लागले.वास्तविक कचारगड यात्रापरिसरात ही आढावा बैठक घेऊन सर्व अधिकारी व संस्थांना जागेसह प्रत्यक्ष काय करायचे हे अधिक सांगता आले असते. परंतु फक्त एका आमदारासाठी न करता झालेली बैठक ही पारदर्शक प्रशासनाचे ढोल पिटणार्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठीही पारदर्शक म्हणायची का अशी चर्चा रंगू लागली आहे.