नवेझरी परिसरात गारांचा पाऊस

0
29

गोंदिया,दि.15ःः जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यांतर्गत येत असलेल्या नवेझरी परिसरात आज सायकांळी साडेचार वाजेनंतर अचानक आलेल्या वादळी वार्यासह पावसामुळे पिकाचे व धान खरेदी केंद्रावरील धानाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.सुमारे अर्धा तास चाललेल्या पावसासोबत मोठ्याप्रमाणात गारांचा पाऊस पडला.दुपारपासूनच वातावरणात बदल झाला असून ढगाळमय वातावरण झाले आहे.मोठ्यामोठ्याने मेघगर्जना होत असून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे.