आज कचारगड येथे भव्य आरोग्य शिबिर

0
19
– मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांची उपस्थिती
गोंदिया,दि.17ः-राष्ट्रीय स्तरावरचा गोंडी समाजाचा सांस्कृतिक उत्सव, महाअधिवेशन एवं कोया पुनेमनिमित्त सालेकसा तालुक्यातील धनेगाव येथील कचारगड  येथे १७ फेबु्रवारीपासून पारी कोपार लिंगो मां काली कंकाली पेनठाना देवस्थान येथील यात्रेला सुरूवात होत आहे. २१ फेबु्रवारीपर्यंत चालणाºया या उत्सवात १८ फेबु्रवारी रोजी भव्य अटल आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आमदार संजय पुराम यांनी दिली.
यावेळी प्रामुख्याने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेट्ये, गोंडवाना गोंड समाजाचे जिल्हाध्यक्ष भरत मडावी, अखिल भारतीय कोया पुनेम सेवा संस्थेचे अध्यक्ष गेंदलाल वर्चो, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष दुर्गेश रहांगडाले आदी उपस्थित होते.
पुढे माहिती देताना आ. पुराम म्हणाले की, धर्मगुरू पाहंदी पारी कोपार लिंगो यांना श्रद्ध सुमन अर्पित करण्यासाठी देशातील गोंडी समाजबांधव गेल्या ४० वर्षांपासून कचारगडला येतात. दरवर्षी ७ ते ८ लाख गोंडी बांधव येथे येतात. आपली संस्कृति, बोली-भाषा आदींवर मनन-चिंतन करतात.  जागतिक पातळीवर गोंडीयन समाजबांधवांची धर्मभूमी म्हणून मान्यता प्राप्त या स्थळाचे पाहिजे त्या प्रमाणात विकास होऊ शकले नाही. तसेच शासनाने मागील ४० वर्षात या धर्मभूमीची दखल घेतली नाही. शासनाने याकडे अधिक लक्ष द्यावे, हा दृष्टीकोण ठेवून वर्ष २०१४ पासून दरवर्षी राज्याचे व केेंद्राचे मंत्र्यांना आम्ही येथे आणण्याचे प्रयत्न केले व ते आले. आज या भूमीला मोठे महत्व प्राप्त झाले असून शासनाने याची दखल घेतली असून पहिल्यांदाच मुख्यमंत्री गोंडी बांधवांचा भेटीकरीता येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी १८ फेबु्रवारी रोजी कचारगडला येत असून  अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त भागात प्रवास करणारे मुख्यमंत्री फडणवीस हे पहिले आहेत. दरवर्षी येथे ५ ते ७ लाख आदिवासी बांधव येतात. त्यांना औषधोपचाराची विश्ोष सुविधेसाठी भव्य अटल आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात तीन शेच्या वर विशेषज्ज्ञ डॉक्टरांची चमू येणार असून प्रयोगशाळा, ईसीजी, फार्मसी आदी सर्व सुविधा करण्यात आली आहे. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तपासणी  चालणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवक, कार्यकर्ते आपली सेवा देणार आहेत. ४० ते ५० हजार लोकांची तपासणी या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून करण्याचे नियोजन आहे.
डॉ. शेट्ये यांनी माहिती देतांना सांगितले की, आ. पुराम यांच्या निवेदनावर मुख्यमंत्र्यांनी विशेष निर्देश देत या शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक रूग्णावर मोफत रोगनिदान व औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने कर्करोग, हृदय रोग, मधुमेह, मोतियाबिंदु, किडनीचे आजार, मेंदु रोग इतर दुर्धर आजारावर उपचार होणार असून यासह सिकलसेल, हिप प्रत्यारोपण, गुडघे प्रत्यारोपण आदीवर सुद्धा उपचार होणार असून कोणत्याही रोगापासून पिडीत रूग्णाचे उपचार मुंबई येथून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जवळपास ४० हजार लोकांची रक्त तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.
दुर्गाप्रसाद कोकोटे यांनी सांगितले की, या पाच दिवसीय उत्सवात १७ रोजी कोयापुनेम गढ जागरण, १८ रोजी राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन ध्वजारोहण व गढ महारैली तसेच राष्ट्रीय गोंडी सांस्कृतिक महोत्सव, १९ रोजी राष्ट्रीय महा गोंगोना कोया पुनेम महासंमेलन व गोंडी धर्म, भाषा सांस्कृतिक राष्ट्रीय अधिवेशन, २० रोजी राष्ट्रीय गोंडवाना साहित्य महासंमेलन, २१ रोजी महाअधिवेशनाचे समापन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.