बंगाली समाजाच्या उन्नतीसाठी कटिबद्ध-खासदार अशोक नेते

0
22

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.22ःःबंगाली समाजाची गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रापार्टी कार्ड देण्याची मागणी होती.त्या मागणीची दखल घेत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व महाराष्ट्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळेच आज बंगाली बांधवांना भूमी स्वामित्वचे कार्ड वितरीत करता येऊ शकले ही समाजासाठी गौरवाची बाब आहे. तसेच इतर अडचणी समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी )पुणे च्या वतीने आयोजित महाराष्ट्रातील बंगाली नमोशुद्र समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थितीचे सर्वेक्षण अंतर्गत चामोर्शी तालुक्यातील नेताजीनगर येथे आयोजित एकदिवसीय कार्यशाळेचे उदघाटन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी खासदार नेते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे आदिवासी विकास व वन राज्यमंत्री राजे अंबरीशराव महाराज आत्राम, गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, गडचिरोली विधानसभाचे आमदार डॉ देवराव होळी, जिप अध्यक्ष योगीताताई भांडेकर ,जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, बंगाली आघाडी चे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, जिप सदस्य नामदेवजी सोनटक्के, जिप सदस्या शिल्पा रॉय, दिपकजी हलधर, विधान रॉय, विधान व्यापारी, भाजपचे जिल्हा सचिव तथा पं स सभापती आनंद भांडेकर, पं स उपसभापती आकुलीताई बिश्वास, सरपंच अनिता रॉय, मूलचेरा तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता, विष्णुजी ढाली, चामोर्शीचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे व बंगाली आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमात बंगाली बांधवांना प्रॉपर्टी कार्ड चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ना. बडोले, ना. आत्राम व आम. डॉ देवराव होळी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी 20 ते 25 गावातील बंगाली समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.