गोदामावर धाड, दीड लाखाच्या पॉलिथीन पिशव्या जप्त

0
13

गोंदिया,दि.24ः-शहरातील सर्कस मैदान परिसरातील एका गॅरेजमध्ये महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व नं.प.ने संयुक्तरित्या कारवाई करून प्रतिबंध असलेले १५00 किलो पॉलिथीन पिशव्या जप्त केल्या. ही कारवाई २१ फेब्रुवारीच्या दुपार दरम्यानची आहे. राज्यात पॉलिथीन पिशव्या व त्याच्या उपयोगीतेवर बंदी लावण्यात आली आहे. बंदी असून देखील शहरात मोठया प्रमाणात पॉलिथीन व डिस्पोजलचा वापर होत असल्याची गुप्त माहिती महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता दरम्यान शहरातील मोक्षधाम मार्गावरील सर्वष्ठस मैदाना जवळील ब्राईट गॅरेजच्या गोदामावर धाड टाकून १५00 किलो प्रतिबंधीत असलेले प्लास्टिक जप्त केले असून याची अंदाजे किं मत दिड लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच गॅरेज मालकावर ५ हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर कारवाई महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ भंडाराचे निरीक्षक महेश भिवापुरकर तसेच गोंदिया नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे प्रमुख गणेश हथकैय्या,आरोग्य निरीक्षक प्रफुल पानतावणे, मनीष बैरीसाल, मुकेश शेंद्रे, कनिष्ठ अभियंता सुमेध खापर्डे, स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक प्रतिक मानकर यांनी केली.